भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचा सामन्यानंतरचा ‘चहल टिव्ही’ हा शो सध्या चांगलाच प्रसिद्ध होत आहे. या शोमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी असे अनेक खेळाडूंनी हजेरी लावली आहे. तसेच हे खेळाडू या शोचे प्रमोशन करतानाही दिसून आले आहेत.
मात्र या शोमध्ये आत्तापर्यंत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने कधीही हजेरी लावली नाही. त्यामुळेच धोनीनेही या शोमध्ये यावे यासाठी चहल न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यानंतर प्रयत्न करताना दिसला आहे. पण धोनी चहलपासून दूर पळताना दिसून आला आहे.
झाले असे की रविवारी(3 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्धची पाच सामन्यांची वनडे मालिका भारताने 4-1 अशा फरकाने जिंकल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू ट्रॉफी बरोबर फोटो काढत होते. यावेळी चहल धोनीच्या मागे पळत होता. तर धोनी चहलपासून दूर पळत सरळ ड्रेसिंग रुमकडे गेला.
त्यावेळी चहल धोनीने ‘चहल टिव्ही’ या शोमध्ये येऊन मुलाखत द्यावी यासाठी प्रयत्न करत होता. पण धोनीने गमतीशीरपणे यासाठी नकार दिला.
https://twitter.com/WastingBalls/status/1092007092481810433
अखेर चलहला रविवारी भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने मुलाखत दिली. यावेळी चहलने रोहितला विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मला टी20 मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी मिळेल का असा प्रश्न विचारला होता.
यावर रोहितने चहलला प्रत्युत्तर देताना म्हटले, ‘चहल हा आमचा मागच्या सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्या सामन्यात आम्ही पराभूत झालो. आम्ही जो सामना जिंकणार त्या सामन्यात तू सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असावा असे मला वाटते. तिसऱ्या क्रमांकावरच्या फलंदाजीबद्दल मी रवी यांच्याशी बोलतो.’
भारताने न्यूझीलंडला रविवारी पाचव्या वनडे सामन्यात 35 धावांनी पराभूत केले. त्याआधी या वनडे मालिकेत भारताने पहिले तीनही सामने जिंकले होते. फक्त चौथ्या वनडे भारताला पराभव स्विकारावा लागला.
आता बुधवारपासून(6 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–युवीचा तो विक्रम धोक्यात, मुंबईकर हिटमॅनच टी२० मालिकेत मोडणार तो विक्रम
–बापरे! या फलंदाजाने एकाच सामन्यात केली दोन द्विशतके…
–टीम इंडिया विरुद्धच्या टी२० मालिकेला न्यूझीलंडचा हा स्पोटक खेळाडू मुकणार, जाणून घ्या कारण
–पुणेकर केदार जाधवसाठी एमएस धोनीचा मराठमोळा अंदाज, पहा व्हिडिओ