‘कॅप्टनकूल’ म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं बाईक वेड आणि आलिशान गाड्यांचे वेड जगजाहीर आहे. त्याच्याकडे अनेक स्पोर्ट बाईक्स आणि महागड्या गाड्या आहेत. आता धोनीने अजून एक नवी कार खरेदी केली आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
धोनीने त्याच्या गाड्यांच्या संग्रहात आणखीण एक ‘लँड रोव्हर सीरीज III १९७० स्टेशन वॅगन’ जोडली आहे. बिग बॉय टॉईज कंपनीने आयजित केलेल्या विंटेज आणि क्लासिक कारच्या ऑनलाइन लिलावात धोनीने ही गाडी खरेदी केले आहे.
धोनीने लँड रोव्हर किती किमतीला विकत घेतली आहे, हे सांगण्यास ई-ऑक्शन कंपनीने नकार दिला आहे. हा लिलाव ऑनलाइन झाला असून १९ डिसेंबर रोजी सुरू झाला होता आणि महिनाभर चाललेला ई-लिलाव ८ जानेवारी २०२२ रोजी संपला.
या ऑनलाईन लिलावात देशभरातील अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले होते. बिग बॉय टॉईज कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी १९ विशेष कारची यादी लिलावासाठी ठेवली ज्यामध्ये रोल्स रॉयस, कॅडिलॅक, ब्यूक, शेवरलेट, लँड रोव्हर, ऑस्टिन, मर्सिडीज-बेंझ आणि इतर गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या देशभरातील आलिशान गाड्या आहेत आणि गुडगावच्या प्रमुख शोरूममध्ये प्रदर्शित केल्या जात होत्या.
https://www.instagram.com/p/CYRN4T6IFZX/
व्हिंटेज फॉक्सवॅगन बीटल १९६० या गाडीचा लिलाव १ रुपयांपासून सुरू झाला आणि २५ लाख रुपयांपर्यंत गेला आणि हा लिलाव एका तरुण उद्योजकाने जिंकला.
धोनीला आहे बाईक्स आणि कारची आवड
साल २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला पहिल्यापासूनच कार आणि बाईक्स आवड आहे. त्यामुळे तो नेहमीच नवनवीन कार आणि बाईक्स त्याच्या गॅरेजमध्ये जोडत असतो. त्याची हीच आवड लक्षात घेत त्याने त्याच्या रांचीच्या आलिशान बंगल्यात मोठे गॅरेजही बनवून घेतले आहे. त्याचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसेच अनेकदा तो त्याच्या एखाद्या बाईकवर त्याची लेक झिवाला फिरवतानाही दिसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘व्वा शिखी भाई, ऐसा रोका की कॅमेरा में भी नहीं दिख रखा’; पंतची मजेशीर बडबड स्टंप माईकमध्ये कैद
तीन वर्षे आणि तब्बल २३३ चेंडूंनंतर बुमराहला मिळाली ‘ती’ विकेट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संपवला दुष्काळ