---Advertisement---

‘माही’च्या मृत गर्लफ्रेंडचे फोटो तूफान व्हायरल, जाणून घ्या तिच्या मृत्यूचे कारण

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत घरी वेळ घालवत आहे. परंतु धोनीच्या आयुष्यातील एक भाग असा आहे, जो बऱ्याच लोकांना माहित नाही.

साक्षीसोबत लग्न करण्याअगोदर धोनीचे आयुष्यात एक मुलगी होती, जिच्यावर तो खुप प्रेम करत असे. परंतु नशिबाने त्या दोघांना वेगळे केले. धोनीच्या वैयक्तिक आयुष्यावर बनवलेला चित्रपट ‘एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ यमध्ये या प्रसंगाचा उल्लेख केला आहे.

धोनीच्या मृत प्रेयसीचे फोटो व्हायरल
धोनीच्या प्रेयसीचे नाव प्रियंका झा होते. धोनी तिच्यावर खुप प्रेम करत असे आणि ते दोघे लग्नसुद्ध करणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु दुर्दैवाने प्रियंकाचा कार अपघातात मृत्यू झाला होता. सध्या सोशल मीडियावर धोनी व त्याच्या पहिल्या प्रेयसीचे फोटो समोर येत आहेत, ज्यामध्ये दोघे सोबत असल्याचे दिसून येत आहे. सूत्रांचे असे मत आहे की, ही दुसरी कोणी नसुन प्रियंका झा आहे.

धोनीने क्रिकेटविश्वात खूप नाव कमावले
जेव्हा धोनीला समजले की प्रियंका त्याला सोडून गेली. तेव्हा तो खुप खचला होता, असे अनेकांनी सांगितले आहे. धोनीच्या जवळील व्यक्तींचे असेही मत होते की, तो खूप दिवस क्रिकेटपासून दूर होता. परंतु त्याने स्वतला सावरले आणि क्रिकेटमध्ये पुढे खूप नाव कमावले.

धोनीची कामगिरी
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी टी२० विश्वचषक (2007), क्रिकेट विश्वचषक (2011) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा (2013) मान मिळवला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. गतवर्षी त्याच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघ साजेशी कामगिरी करु शकला नव्हता. परंतु आयपीएल 2021 मध्ये त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे. आयपीएल 2021 चा हंगाम स्थगित होण्यापुर्वी 7 पैकी 5 सामने जिंकत चेन्नई संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंड दौरा नडला; ५ भारतीय क्रिकेटपटू, जे इंग्लंडच्या भूमीत ठरले फ्लॉप अन् कसोटी संघातून मिळाला डच्चू

‘सतत अदलाबदली केली, नाहीतर मी आज ४९ नव्हे २४९ सामने खेळलो असतो,’ भारतीय फलंदाजाने मांडली व्यथा

तीन वर्षांपुर्वीच द्रविडला मिळाली होती टीम इंडियाचा महागुरु बनण्याची ऑफर, ‘या’ कारणामुळे दिला होता नकार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---