एमएस धोनी भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक राहिला आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघान टी-20 आणि वनडे विश्वचषक जिंकला आहे. धोनी सध्या दुबईमध्ये त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याचे समोर आले आहे. त्याने नवीन वर्षाची सुरुवात देखील दुबईच्या झगमगाटामध्ये केली आहे. धोनीची पत्नी साक्षी धोनी हिने दुबईतील एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ धोनी आणि त्यांची मुलगी झिवा दिसत आहेत.
एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी मागच्या दोन वर्षांत अनेकदा त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना चाहत्यांना दिसला आहे. अशातच आता 2022 ला निरोप देण्यासाठी एमएस धोनी (MS Dhoni) आणि त्याचे कुटुंब काही दिवसांपूर्वी दुबईला रवाना झाले होते. याच ठिकाणी त्यांना आगमी वर्षाचे स्वागत देखील केले आहे. धोनी आणि रिवाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साक्षी धोनीने हा व्हिडिओ शूट केला असून सोशल मीडियावर पोस्ट देखील केला आहे. चाहत्यांकडून या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
View this post on Instagram
धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने 23 डिसेंबर 2004 साली भारतासाठी पदार्पण केले. त्यानंतर 2005 मध्ये त्याला भारताच्या कसोटी संघात देखील संधी मिळाली. 2006 साली तो भारताच्या टी-20 संघाचा महत्वाचा भाग बनला. पहिला आयसीसी टी-20 विश्वचषक 2007 साली खेळला गेला असून त्याच्या नेतृत्वातील भारतीय संघ या स्पर्धेत विजेता बनला होता. पुढे 2011 साली धोनीच्याच नेतृत्वात भारताने वनडे विश्वचषक जिंकला. 2013 साली धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली.
15 ऑगस्ट 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला, पण त्याआधी असे अनेक विक्रम केले, जे आजही अबाधित आहेत. आज वयाच्या 41 व्या वर्षी देखील धोनी आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून खेळत आहे. आगामी आयपीएल हंगामात धोनीला खेळताना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच्या नेतृत्वात सीएसके आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकला आहे. (MS Dhoni and Ziva Dhoni celebrating New Year in Dubai)
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ गोलंदाजांनी गाजवली 2022मध्ये कसोटी, सर्वाधिक विकेट ‘या’ गोलंदाजाच्या नावावर
2022 मधील ‘या’ पाच पार्टनरशिप्स नाही विसरू शकणार चाहते! यादीत विराट, वॉर्नरसारख्या दिग्गजांचा समावेश