---Advertisement---

Asia Cup 2023मध्ये रोहित घडवणार इतिहास! धोनीचा सर्वात मोठा Record मोडण्याची ‘हिटमॅन’ला संधी

Ms Dhoni and Rohit Sharma
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषकाचा प्रबळ दावेदार दिसत आहे. भारतीय संघ आपल्या सामन्याची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला सामना होणार रंगणार. मात्र, आशिया चषकमध्ये कर्णधार म्हणून कोणत्या खेळाडूच्या नावावर  सर्वाधिक धावांचा विक्रम आहे हे तुम्हाला माहिती आहे का? या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी यात आघाडीवर आहे.

एमएस धोनी (MS Dhoni) याने आशिया चषकमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत. धोनीने आशिया चषक 2008 मध्ये 327 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर या यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया चषक 2018 मध्ये रोहित भारतीय संघाचा कर्णधार होता. आशिया चषक 2018 मध्ये रोहित शर्माने 317 धावा केल्या होत्या.

महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता रोहितकडे अजून एक संधी चालून आली आहे. तो धोनीचा विक्रम मोडतो की नाही हे पाहणे मनोरंजक असणार आहे.

या यादीत आणखी कोणाचे नावे आहेत?
श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने 1997 च्या आशिया चषकात 272 धावा केल्या होत्या. यानंतर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचा क्रमांक लागतो. आशिया चषक 2010 मध्ये शाहिद आफ्रिदी पाकिस्तान संघाचा कर्णधार होता. शाहिद आफ्रिदीने या स्पर्धेत 265 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे नावही या यादीत सामील आहे. आशिया चषक 2004 मध्ये सौरव गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होता. आशिया चषक 2004 मध्ये सौरव गांगुलीने कर्णधार म्हणून 244 धावा केल्या होत्या. (ms dhoni asia cup record as capptain break rohit sharma in asia cup 2023)

महत्वाच्या बातम्या- 
जरा इकडे पाहा! भारताच्या माजी प्रशिक्षकाने वर्ल्डकपसाठी निवडला अंतिम संघ, ‘या’ 2 शिलेदारांना दिला डच्चू
लईच भारी! स्टार खेळाडूने वाचला कॅप्टन कमिन्सच्या कौतुकाचा पाढा, म्हणाला… 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---