इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम येत्या २६ मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामात दोन नवीन फ्रँचायझी संघ सामील झाल्याने एकूण संघांची संख्या ८ वरून १०वर गेली आहे. या १० संघांमध्ये एकूण ७४ सामने खेळले जाणार आहे. यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे. यावेळी एमएस धोनी त्याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाला ५व्यांदा आयपीएलचा किताब जिंकून देण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. धोनीच्या उपस्थितीमुळे कदाचित हे शक्यही होऊ शकते. कारण, आकडेवारी पाहिली तर आयपीएलच्या इतिहासात धोनीपेक्षा सर्वोत्तम फिनिशर आतापर्यंत कुणीच झाले नाहीये. शेवटच्या ५ षटकात धावा बनवण्याची गोष्ट येते आणि धोनी क्रीझवर असतो, तेव्हा गोलंदाजांची धुलाई करण्यात धोनी अव्वल क्रमांकावर असतो.
धोनी १५ व्या षटकापासून करतो धुलाई
आकडेवारी पाहिली, तर शेवटच्या ५ षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत एमएस धोनी (MS Dhoni) अव्वल क्रमांकावर आहे. तसं पाहिलं, तर १५ व्या षटकातही धोनीने आतापर्यंत सर्वाधिक ४४२ धावा केल्या आहेत. १६ व्या षटकात येऊन तो धावफलकावर आकडा आणखी वेगाने वाढवत जातो. या षटकात धोनीने सर्वाधिक ४७६ धावा केल्या आहेत. चला पाहूया शेवटच्या ५ षटकात कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत.
सामन्याच्या १६व्या षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
४७६* धावा- एमएस धोनी
४४७ धावा- एबी डिविलियर्स
३३६ धावा- रोहित शर्मा
३१४ धावा- कायरन पोलार्ड
३०५ धावा- युवराज सिंग
सामन्याच्या १७व्या षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
५७२ धावा- एमएस धोनी
४४५ धावा- कायरन पोलार्ड
३८६ धावा- एबी डिविलियर्स
३६२ धावा- रोहित शर्मा
३६० धावा- दिनेश कार्तिक
सामन्याच्या १८व्या शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
५९६ धावा- एमएस धोनी
४३३ धावा- कायरन पोलार्ड
४०६ धावा- एबी डिविलियर्स
२९३ धावा- रोहित शर्मा
२७६ धावा- विराट कोहली
सामन्याच्या १९व्या षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
५९९ धावा- एमएस धोनी
४०४ धावा- एबी डिविलियर्स
३६२ धावा- कायरन पोलार्ड
३०६ धावा- रवींद्र जडेजा
२७३ धावा- हार्दिक पंड्या
सामन्याच्या २०व्या षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
६१० धावा- एमएस धोनी
३७८ धावा- कायरन पोलार्ड
२७६ धावा- रवींद्र जडेजा
२४८ धावा- रोहित शर्मा
२३३ धावा- हार्दिक पंड्या
धोनीच्या नेतृत्वात ५वा किताब जिंकण्यासाठी उतरणार चेन्नई
चेन्नई संघ हा आयपीएल (IPL) इतिहासातील दुसरा सर्वाधिक यशस्वी संघ आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने ४ वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. सोबतच चेन्नईने ५ वेळा उपविजेतेपदही पटकावले आहे. कोरोनामुळे मागील हंगाम युएईत पार पडला होता. त्यावेळी अंतिम सामन्यात कोलकाता संघाला पराभूत करत चेन्नईने किताबावर नाव कोरले होते. यावेळी संघ ५वा किताब जिंकण्यासाठी उतरेल. आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ५ वेळा किताब जिंकला आहे.
आयपीएल २०२२ हंगामासाठी चेन्नईने ४ खेळाडूंना रिटेन केले. त्यांनी अष्टपैलू रवींद्र जडेजावर सर्वाधिक रुपये खर्च केले आहेत. त्यांनी एकूण १६ कोटी रुपयांमध्ये जडेजाला रिटेन केले. चेन्नईने कर्णधार धोनीला १२ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. धोनीने स्वत:च या हंगामासाठी आपल्या मानधनात ३ कोटी रुपये कमी केले आहेत. दुसरीकडे, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली आणि भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडवर प्रत्येकी ८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराटने कर्णधारपद सोडणे विरोधी संघासाठी धोक्याची घंटी’, असे का म्हणाला ग्लेन मॅक्सवेल? घ्या जाणून
पंड्या बंधू खेळणार वेगवेगळ्या आयपीएल संघांकडून, हार्दिकची वहिनीने शेअर केला भावूक व्हिडिओ
काय आहे एमएस धोनीच्या ‘जर्सी नंबर- ७’चे रहस्य? खुद्द ‘माही’नेच केलाय खुलासा