भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आज 38 वा वाढदिवस आहे. त्याने त्याचा हा वाढदिवस कुटुंबाबरोबरच भारतीय संघाबरोबरही साजरा केला आहे.
धोनी सध्या इंग्लंडमध्ये 2019 चा विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघाबरोबर आहे. त्यामुळे त्याचा यावर्षीचा वाढदिवस इंग्लंडमध्ये साजरा झाला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यामध्ये व्हिडिओमध्ये दिसते की केक कापताना धोनीला त्याची चार वर्षीची मुलगी झिवानेही साथ दिली आहे. तिने केप कापण्यावेळी धोनीला विचारले की ‘तू तयार आहेस का?’ त्यावेळी त्यानेही हो असे उत्तर दिले. त्यानंतर त्याने तिला बरोबर घेत केक कापला आणि केकचा पहिला घासही त्याने झिवाला आणि त्याची पत्नी साक्षीला भरवला.
यावेळी तिथे भारतीय संघातील खेळीडूही उपस्थित होते. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये दिसते की रोहित शर्मासह त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायराही यावेळी भारतीय संघाबरोबर होत्या. केप कापल्यानंतर मजामस्ती करत भारतीय खेळाडूंनी धोनीला केक भरवला.
#HappyBirthdayMSDhoni 🎂💐💐 pic.twitter.com/dWbrQde2cL
— BCCI (@BCCI) July 7, 2019
याआधी धोनीने त्याच्या मित्रमैत्रीणींसह वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्यासह केदार जाधव, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे भारतीय संघातील खेळाडूही देखील उपस्थित होते. या सेलिब्रेशनचे फोटो साक्षी धोनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
धोनीला आज दिवसभरात चाहत्यांकडून तसेच विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरुन भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/BzmIxatnzDi/
https://www.instagram.com/p/Bzl-5YMHgD8/
https://www.instagram.com/p/Bzl9430Hmhn/
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–गांगुली, सचिन नंतर किंग कोहली असा विक्रम करणारा केवळ तिसरा भारतीय
–विश्वचषकात ११ वर्षांनंतर कोहली समोर पुन्हा विलियम्सनच्या न्यूझीलंडचे आव्हान; होणार खास योगायोग
–…आणि अखेर धोनीचे गेल्या वाढदिवसाला अपुर्ण असलेले स्वप्न पुर्ण झाले