भारतीय संघाचा महान कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) गुरुवारी (७ जुलै) त्याच्या ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनी आणि त्याचे कुटुंब सध्या इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ४ जुलै रोजी त्याच्या लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाले. धोनीने त्याचा यावर्षीचा वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रांसोबत साजरा केला आहे. वाढदिवसासाठी युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतही उपस्थित होता. धोनीची पत्नी साक्षी धोनीने वाढदिवसाच्या पार्टीतील खास व्हिडिओ शेअर केला आहे.
साक्षी धोनी (Sakshi Dhoni) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असून धोनीचा वाढदिवस साजरी करण्यासाठी तो उपस्थित राहिला होता. पंतने इंग्लंडविरुद्ध नुकत्याच खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले आहे. ७ जुलै रोजी खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याला विश्रांती दिली गेली आहे. याच कारणास्तव पंत धोनीच्या वाढदिवसासाठी उपस्थित राहू शकला.
https://www.instagram.com/reel/CfsExi5gMgO/?utm_source=ig_web_copy_link
धोनी क्रिकेटच्या इतिहासातील एकमात्र कर्णधार आहे, ज्याने स्वतःच्या संघासाठी आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. २००७ साली आयसीसीच्या पहिल्या टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यानंतर २०११ साली धोनीच्या नेतृत्वातील संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि २०१३ साली इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. धोनीने शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर मागच्या ९ वर्षांपासून भारतीय संघ एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाहीये.
त्याने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी (सीएसके) तो अजूनही खेळतो. आयपीएलच्या १५ व्या हंगामात धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते, पण रवींद्र जडेजाला कर्णधारपदाजा भार पेलता आला नसल्यामुळे धोनी पुन्हा संघाचा कर्णधार बनला. सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाने यापूर्वीच सांगितले आहे की, धोनीला जोपर्यंत खेळायचे आहे, तोपर्यंत तो खेळू शकतो. अशात आयपीएलच्या पुढच्या हंगामात देखील धोनी सीएसकेचे प्रतिनिधित्व करतना दिसू शकतो. धोनीने सीएसकेसाठी एकूण ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
प्रतिक्षा संपली! अखेर भारत पाकिस्तान लवकरच भिडणार, वाचा कधी आणि कुठे होणार सामना
‘हा फोटो कधीचा…?’, असे विचारत सचिनने दिल्या दिग्गजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
पहिल्या टी२० सामन्यात रोहितसोबत ‘हा’ खेळाडू करणार डावाची सुरुवात, अशी असेल भारतीची प्लेइंग११