भारतीय संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी १० जुलै २०१९ पासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दुर आहे. या काळात धोनीने अगदी प्रथम श्रेणी किंवा अ दर्जाचे सामनेही खेळले नाहीत. असे असले तरी धोनी संघात परतण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहे.
याचसाठी धोनी आयपीएलकडे एक सुवर्णसंधी म्हणून पाहत असणार आहे. परंतु आयपीएलचं पुढे ढकलली गेल्यामुळे धोनीसमोरची संकटे वाढली आहे. त्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार विरेंद्र सेहवागने धोनीचे पुनरागमन जवळपास अशक्यच असल्याचे म्हटले आहे.
“सध्या संघात रिषभ पंत व केएल राहुल चांगली कामगिरी करत आहे. त्यात केएल राहुल तर जबरदस्त फाॅर्ममध्ये आहे. मग धोनीला नक्की कुठे जागा आहे. ” असे वक्तव्य सेहवागने केले आहे.
असे असले तरी धोनी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणारा टी२० विश्वचषक खेळण्यासाठी नक्कीच उत्सुक असणार आहे. परंतु आयपीएल रद्द झाली किंवा पुढील काही महिने क्रिकेट ठप्प झाले तर धोनीसमोरची संकटे वाढू शकतात. तरीही धोनीची संघात निवड झाली तर मात्र निवडकर्त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागु शकते. तसेच सरळ दीड वर्षांनी धोनीला संघात निवडण्याची कारणेही द्यावी लागु शकतात.
ट्रेडिंग घडामोडी-
– इंग्रजीवरुन झालं पाकिस्तानी खेळाडूचं जगभरात हसु, तुझे ट्विट वहिनी करते का?
– बीडचा सुपूत्र संजय बांगरने नाकारली बांगलादेशची मोठी ऑफर
– विराटला सचिनच्या फेअरवेलच्या सामन्यात होती द्विशतकाची संधी
–…आणि त्या षटकाराने दिनेश कार्तिक हिट झाला!
-…तर धोनीने नक्कीच टीम इंडियात कमबॅक करायला पाहिजे!