---Advertisement---

…म्हणून धोनी प्रत्येक सामन्यात बदलतोय बॅट

---Advertisement---

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. तसेच काही रिपोर्टप्रमाणे 2019 विश्वचषकातील भारतीय संघाचा शेवटचा सामना हा धोनीचाही शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचबरोबर धोनीनेच त्याच्या काही कृतींमधून तो लवकरच निवृत्ती घेणार असल्याचे सुचविले आहे. धोनी सध्या चालू विश्वचषकात विविध ब्रँड्सच्या बॅट वापरताना दिसून येत आहे. या विविध ब्रँड्सने त्याला त्याच्या काराकिर्दीच्या विविध टप्प्यावर प्रायोजकत्व दिले आहे. त्यामुळे तो या ब्रँड्सप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध ब्रँड्सच्या बॅट वापरत आहे.

यामध्ये त्याने एसजी (SG) ब्रँड, वॅम्पायर ब्रँड(BAS) च्या बॅट वापरताना दिसून येत आहे. याबद्दल धोनीचा जवळचा मित्र अरुण पांडेने मुंबई मिररशी बोलताना स्पष्ट केले आहे की धोनी त्याच्या कारकिर्दीत त्याला साथ देणाऱ्या ब्रँड्सबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे.

पांडे मिररशी बोलताना म्हणाले, ‘हे सत्य आहे की तो विविध ब्रँड्सच्या बॅट वापरत आहे. पण त्यासाठी तो कोणतेही शुल्क घेत नाही. त्याला कारकिर्दीच्या विविध टप्प्यावर साथ देणाऱ्या या ब्रँड्सबद्दल तो कृतज्ञता व्यक्त करु इच्छित आहे.’

‘त्याला पैशांची गरज नाही, त्याच्याकडे ते पुरेसे आहेत. तो विविध ब्रँड्सच्या बॅट चांगल्या भावनेने वापरत आहे. बासने(BAS) त्याला सुरुवातीपासून साथ दिली आहे आणि एसजी(SG) सुद्धा त्याच्यासाठी उपयुक्त ठरले.’

पण पांडे यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल काही भाष्य करणे टाळले आहे. तसेच अजून बीसीसीआयनेही धोनीबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

काल निवृत्ती घेतलेल्या अंबाती रायडूला विराट कोहलीने अशा दिल्या शुभेच्छा

मयंक अगरवालला टीम इंडियात संधी देण्याचा विराट-शास्त्रींनी घेतला निर्णय?

इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यानंतर अशी झाली आहेत सेमीफायनलची समीकरणे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment