बुधवारी(3 जूलै) भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या या अचानक निवृत्ती घेण्याच्या निर्णयाची खूप चर्चा झाली. तसेच त्याला अनेकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही रायडूला अव्वल दर्जाचा व्यक्ती म्हणत ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘अंबाती पुढील वाटचालीसाठी तूला शुभेच्छा. तू अव्वल दर्जाचा व्यक्ती आहेस.’
https://twitter.com/imVkohli/status/1146411234230620160
रायडूने बुधवारी बीसीसीआयला इमेल करुन त्याच्या निवृत्तीचा निर्णय कळवला होता. या इमेलमध्ये त्याने बीसीसीआयचे आणि त्याने प्रतिनिधित्व केलेल्या राज्य क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले आहेत.
तसेच विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्या नेतृत्वाखाली खेळायला मिळाल्याने त्यांचे देखील त्याने आभार मानले आहेत.
रायडूने अचानक निवृत्ती घेण्यामागील कारण अजून स्पष्ट झाले नाही. पण तो मागील अनेक दिवसांपासून 2019 विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी न मिळाल्याचे चर्चेत होता.
2019 विश्वचषकातून भारताचे शिखर धवन आणि विजय शंकर हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्यानंतरही राखीव खेळाडू असलेल्या अंबाती रायडूला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. रायडूच्या निवृत्ती मागे हे एक कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी विराटने रायडूचे कौतुक करताना तो चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज असल्याचे म्हटले होते. पण तरीही त्याला विश्वचषकासाठी संघात संधी मिळाली नाही.
33 वर्षीय रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 55 वनडे सामन्यात खेळताना 47.05 च्या सरासरीने 1694 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने 6 टी20 सामने खेळले असून यात त्याला केवळ 42 धावा करण्याच यश आले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मयंक अगरवालला टीम इंडियात संधी देण्याचा विराट-शास्त्रींनी घेतला निर्णय?
–इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यानंतर अशी झाली आहेत सेमीफायनलची समीकरणे
–पृथ्वी शॉ विंडीज दौऱ्यातून बाहेर; या तीन खेळाडूंना मिळाली संघात संधी






