सोशल मीडिया अकाऊंटवरून सेलेब्रिटी त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांबद्दल चाहत्यांना कळवत असतात. भारतीय चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री राय लक्ष्मी हिने पण तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. २७ एप्रिल रोजी तिचा साखरपुडा होणार असल्याच्या वृत्तांना उधान आले आहे. पहिले राय लक्ष्मीचे नाव माजी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीसोबत जोडले गेले होते.
राय लक्ष्मी धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज टीमसोबत २००८ ला जोडली गेली होती. ती त्या टीमची ब्रँड अँबेसेडर होती. याच काळात धोनी आणि राय लक्ष्मी जवळ आल्याची चर्चा झाली होती. पण लवकरच त्यांचे ब्रेकअप झाल्याचे कळाले. त्या दोघांचे नाते लवकरच संपले. पण त्यांचे नाते संपण्यामागे कोणते कारण होते? हे अजून पण अस्पष्ट आहे.
राय लक्ष्मीने एका मुलाखतीत तिच्या आणि धोनीच्या ब्रेकअप बद्दल माहिती दिली होती. धोनी आणि आपल्यातील नाते ही एक मोठी चूक राहिल्याचेही तिने सांगितले होते. ती त्यानंतर ३ ते ४ वेळा ती रिलेशनशिपमध्ये राहिली असल्याचीही चर्चा आहे.
राय लक्ष्मीने जेव्हा लग्नाची घोषणा केली तेव्हा सोशल मीडियावर गोंधळ उडाला. या महिन्याच्या २७ तारखेला तिचा साखरपुडा होणार असल्याचे तिने सांगितले होते. परंतु ती एक विनोदी पोस्ट असल्याचे सांगत तिने लग्नाच्या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.
राय लक्ष्मी हे दाक्षिणात्य चित्रपटात खूप गाजलेले नाव आहे. तिने आतापर्यंत हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटात काम केले आहे.
🙏🙏🙏 pic.twitter.com/R7NGtxsRFZ
— RAAI LAXMI (@iamlakshmirai) April 6, 2021
Please read 🙏🙏🙏 pic.twitter.com/zxTqUdVgc0
— RAAI LAXMI (@iamlakshmirai) April 8, 2021
तसेच चेन्नईचा संघनायक धोनी हा जुलै २०१० मध्ये साक्षी धोनी हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला होता. त्यांना २०१५ साली कन्यारत्नही प्राप्त झाले. त्यांनी तिचे नाव झिवा धोनी असे ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मी सराव करुन परतलो आणि वडीलांचे निधन झाल्याचे कळाले; सिराजचा दु:खद आठवणींना उजाळा
आयपीएल २०२१ चा उद्घाटन सोहळा ठरणार खास, पहिल्यांदाच दिसणार ‘हे’ विशेष दृश्य