भारतीय संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार एमएस धोनी नेहमीच हटके गोष्टी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. क्रिकेटच्या मैदानावर आश्चर्यकारक निर्णय घेऊन प्रतिस्पर्ध्यांना कोंडीत पकडणे, हे धोनीचे वैशिष्ट्य होते. २०२० साली संपूर्ण जग कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये असताना धोनीने मैदानाबाहेरही आपण हटके गोष्टी करू शकतो, याचा प्रत्यय दिला होता. लॉकडाऊन दरम्यान त्याने रांची येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या याच शेतीतील भाज्या आता प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. यांच्या किंमतीही स्वस्त आहेत.
धोनीच्या शेतातील या भाज्या बाजारात उपलब्ध झाल्यापासून ग्राहकांची त्याला मोठी मागणी आहे. धोनीने मात्र व्यवसायात स्थिरावण्यासाठी आपल्या उत्पादनाची किंमत बाजारभावाच्या तुलनेत कमी ठेवणे पसंत केले आहे. रांची येथील फळबाजाराच्या जवळच धोनीच्या शेतातील भाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यापैकी कोबी १० रुपये किलो दराने, तर टमाटे ३० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. मात्र, होलसेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना किंमतीत सूटही देण्यात येत आहे.
धोनीने काही काळापूर्वी धुर्वा सेंबो येथील फार्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरीचे काम सुरू केले होते. एकूण ५५ एकराची ही शेती आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. याव्यतिरिक्त दुधाचे उत्पादनही होत आहे. ईजा फॉर्म या ब्रँडमार्फत उत्पादनांची विक्री केली जात आहे. याव्यतिरिक्त धोनीने कुक्कुटपाल व्यवसायातही उडी घेतली आहे.
यावर्षी घेतली निवृत्ती
एमएस धोनीने १५ ऑगस्ट, २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना तो २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळला होता. त्या उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहणेच पसंत केले होते. २०२० साली होणाऱ्या टी-२० विश्वचषकातून तो पुनरागमन करेल, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, हा विश्वचषक कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर धोनीने सोशल मीडियावर पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली.
महत्वाच्या बातम्या-
-बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
-ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस बनला इंग्लंड संघाचा फलंदाजी सल्लागार
-अफगाणिस्तान क्रिकेटसाठी खुशखबर; या ठिकाणी बनणार नवे स्टेडियम