---Advertisement---

‘भिडेगा तो बढेगा’, प्रो कबड्डी लीगच्या प्रोमोचा सोशल मीडियावर धुमाकूळ, धोनीच्या अंदाजाची भरपूर चर्चा

On: मंगळवार, डिसेंबर 7, 2021 4:51 PM
PKL 8 Promo
---Advertisement---

प्रतिष्ठित अशा प्रो कबड्डी लीग अर्थात पीकेएलचे (PKL 8) लवकरच पुनरागमन होणार आहे. गेल्या २ वर्षांपासून ही लीग खेळली गेलेली नसून यंदा या लीगचा आठवा हंगाम होणार आहे. २२ डिसेंबरपासून पीकेएलच्या आठव्या हंगामाचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सध्या या लीगमधील सहभागी संघ आणि युवा व दिग्गज कबड्डीपटू त्यांचा जलवा दाखवण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.

यातच सोमवारी (०६ डिसेंबर) पीकेएलच्या अधिकृत प्रसारण भागीदार, स्टार स्पोर्ट्सने या हंगामाचा प्रोमो प्रसारित केला आहे. या प्रोमोमध्ये दिग्गज क्रिकेटपटू आणि ‘कॅप्टनकूल’ म्हणून विख्यात असणारा एमएस धोनी (MS DHoni) असल्याने कबड्डीप्रेमींसह क्रिकेटरसिकही त्याकडे आकर्षित झाले आहेत.

क्रिकेटच्या मैदानावरील आपल्या नेत्रदिकप खेळासह नेहमी आपल्या बदलत्या लूक्समुळेही चर्चेत राहणाऱ्या धोनीचा, प्रो कबड्डीच्या या प्रोमोमध्ये वेगळाच अवतार पाहायला मिळतो आहे. प्रोमोची थीम तू ले पंगा अशी आहे. तर याचे स्लोगन भिडेगा तो बढेगा असे आहे.
अवघ्या एक मिनिटाच्या या प्रोमोला धोनीला आपल्या अभिनयाने चार चाँद लावले आहेत. या प्रोमोदरम्यान तो ३ वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना ताकद आणि प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीची व्यक्तीची भूमिका साकारताना दिसतो आहे.

स्टार स्पोर्ट्सने या प्रोमोचा व्हिडिओ ट्वीट करत लिहिले आहे की, ‘एमएस धोनी म्हणतोय, भिडशील तर पुढे जाशील.. ती घे पंगा (भिडेगा तो बढेगा.. तू ले पंगा). कॅप्टनकूलचा ऍक्शनचा नारा, मग तुम्ही तयार आहात का?.’

२ वर्षांनंतर परतणाऱ्या प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामातील सर्व सामने बंद दाराआड म्हणजेच प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. याबरोबरच सर्व सामने एकाच मैदानावर खेळवले जाणार आहेत. यादरम्यान सर्व सहभागी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला जैव सुरक्षित वातावरणात राहावे लागणार आहे.

२०१४ मध्ये सुरू झालेल्या पीकेएलच्या आठव्या हंगामामध्ये १२ वेगवेगळ्या राज्यातील १२ संघ जेतेपदासाठी झगडताना दिसतील. यामध्ये एकूण १३२ सामने खेळले जाणार आहेत, ज्यात प्रत्येक संघ एका प्रतिद्वंद्वीविरुद्ध केवळ २ सामने खेळेल.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रेयस अय्यर-जयंत यादवच्या षटकारांनी कोहली इंप्रेस; कर्णधारच्या रिएक्शनचे फोटो व्हायरल

न्यूझीलंडला हरवलं, पण एकट्या एजाजपासून नाही जिंकू शकला भारत! विश्वविक्रमाबरोबरच केली ‘ही’ नाद कामगिरी

अश्विनला स्वत:च्याच यशाचे वाटले भरपूर कौतुक, ‘मालिकावीर’ पुरस्कार स्विकारताना दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---