भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी याने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरिदेखील तो काही ना काही कारणामुळे चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे, ते आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांच्या मानहानीच्या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असल्या कारणाने. या बातमीने धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
तर झाले असे की, माजी कर्णधार एमएस धोनीने आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी ( ९ डिसेंबर) सुनावणी केली आहे. धोनीने केलेल्या मानहानीच्या खटल्याला स्थगिती देण्यासाठी आयपीएस जी संपत कुमारने याचिका दाखल केली होती. परंतु, ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
उच्च न्यायालयाने या प्रकरणात आयपीएस जी संपत कुमारची याचिका फेटाळून लावली आहे. यासह मानहानीच्या खटल्याला स्थगिती देण्यास देखील नकार दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २०१४ मध्ये कथित आयपीएल सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपांशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती एन शेषशायी म्हणाले होते की, “यावेळी कोणत्याही प्रकारचा आदेश दिल्याने या खटल्यावर पुढे जाऊन परिणाम होऊ शकतो.”
काय आहे नेमकं प्रकरण?
एमएस धोनीने आयपीएस जी संपत कुमार यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा आरोप केला होता. धोनीने केलेल्या याचिकेत म्हटले गेले होते की, एका टीव्ही मीडिया कंपनीशिवाय, काही लोकांनी कथितपणे त्याची प्रतिमा डागाळणाऱ्या बातम्या चालवल्या. त्या बातम्यांनुसार धोनी मॅच आणि स्पॉट फिक्सिंग आणि आयपीएल मॅच बेटिंमध्ये सहभागी होता.
या प्रकरणात चेन्नई सुपर किंग्ज संघावर २ वर्षांचा बॅन देखील लावण्यात आला होता. सीएसकेचे माजी संघ प्रमुख मयप्पन आणि बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्याचवेळी जी संपत कुमार आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाच्या तपासात सहभागी होते.
महत्वाच्या बातम्या :
“२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराट खचलेला”; माजी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्याची ‘टीम इंडिया’ला संधी, ‘या’ तारखेला होणार सामना
अबब! ३९९ ते ४०० कसोटी विकेट्सपर्यंतचा प्रवास करण्यासाठी नेथन लायनला लागले तब्बल ३२६ दिवस