क्रिकेटटॉप बातम्या

एक फ्लॉप कामगिरी अन् कारकिर्दीला फुलस्टॉप, दक्षिण आफ्रिका दौरा ‘या’ खेळाडूसाठी ठरू शकतो शेवटचा

लवकरच भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये अजिंक्य रहाणेला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्माला हे पद देण्यात आले आहे, तर या संघात आणखी २ खेळाडू आहेत, ज्यांनी या मालिकेत जर फ्लॉप कामगिरी केली, तर ही मालिका त्यांच्या कारकीर्दीतील शेवटची मालिका ठरू शकते.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ईशांत शर्मा गेल्या काही कालावधीपासून निराशाजनक कामगिरी करतोय. अशातच ही मालिका त्याच्यासाठी अंतिम मालिका ठरू शकते. बोर्डच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “रहाणेला उपकर्णधार पदावरून काढून टाकणे, ही एक चेतावणी आहे. त्याला वरिष्ठ खेळाडू म्हणून मोलाचे योगदान द्यावे लागणार आहे. हीच गोष्ट चेतेश्वर पुजारावर देखील लागू होते. तसेच ईशांत शर्मा साठी देखील ही मालिका शेवटची मालिका ठरू शकते. भारतीय संघात अनेक असे युवा खेळाडू आहेत. जे भारतीय संघात स्थान मिळवू शकतात.”

ईशांत शर्माच्या गेल्या एक वर्षातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ८ कसोटी सामन्यात ३३ च्या सरासरीने १४ गडी बाद केले आहेत. यादरम्यान तो दुखापतग्रस्त देखील होता. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे दोन मुख्य गोलंदाज आहेत. तसेच शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, आवेश खान आणि नवदीप सैनी हे युवा खेळाडू देखील अप्रतिम कामगिरी करत आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय संघाला मायदेशात कसोटी मालिका खेळायची आहे. मार्च एप्रिल महिन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या मालिकेत ३ गोलंदाजांना एकाच संघात स्थान मिळणे अवघड आहे. त्यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध एक कसोटी सामना खेळायचा आहे.

न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ईशांतला एकही गडी बाद करता आला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण १०५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ३११ गडी बाद करण्यात यश आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणेसह ‘या’ तिघांची असेल अग्निपरिक्षा, पुन्हा फ्लॉप झाल्यास नारळ पक्का?

‘या’ फलंदाजाचा खराब फॉर्म सुरूच; भारतीय संघातील पुनरागमनावर प्रश्नचिन्ह

“२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराट खचलेला”; माजी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा

Related Articles