---Advertisement---

धोनीने बटलर, पंड्यां बंधुंनंतर कोलकाताच्या दोन खेळाडूंनाही दिली जर्सी भेट, पाहा फोटो

---Advertisement---

गुरुवारी(29 ऑक्टोबर) आयपीएल 2020चा 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. या सामन्यात चेन्नईने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर धोनीने कोलकाताच्या 2 खेळाडूंना त्याची 7 क्रमांकाची जर्सी भेट दिली. या घटनेचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

चेन्नईने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर कोलकाताचा फलंदाज नीतीश राणा धोनीजवळ गेला. यावेळी धोनीने त्याची एक जर्सी त्याला दिली. त्याचवेळी राणा धोनीला नमस्कार करतानाही दिसला. या सामन्यात राणाने कोलकाताकडून 61 चेंडूत 87 धावांची खेळी केली होती.

याबरोबरच धोनीने त्याची एक जर्सी कोलकाताचा फिरकीपटू कुलदीप यादवलाही दिली. एवढेच नाही तर धोनीने त्याची विकेट घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीच्या जर्सीवर स्वाक्षरीही दिली.

https://twitter.com/princesanghavi/status/1321885077014421504

https://twitter.com/Srijesh_Offl/status/1321884530567864321

याआधीही धोनीने यंदाच्या आयपीएल हंगामात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना आपली जर्सी भेट दिली आहे. त्याने राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरला आणि मुंबई इंडियन्सचे अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पंड्या यांना त्याची जर्सी भेट दिली आहे. धोनीच्या या कृतीमुळे अनेक चाहत्यांनी त्याचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असावा, असा कयास लावला आहे.

पण असे असले तरी चेन्नई सुपर किंग्सचे सीइओ कासी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे की 2021 च्या आयपीएल हंगामात धोनीच चेन्नईचे नेतृत्त्व करेल. त्यामुळे आता धोनी नक्की काय निर्णय घेतो हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या –

-बटलर नंतर आता पंड्या ब्रदर्स, धोनी का वाटतोय आपली जर्सी; ‘हे’ तर कारण नाही ना?

-७ नंबर विशेष, फक्त या कारणामुळे धोनी घालयचा ७ नंबरची जर्सी

‘विराट कोहली तर साक्षात देव!’ सुर्यकुमार यादवचा ४ वर्षांपुर्वीचा ट्विट जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---