इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. शनिवारपासून (२६ मार्च) वानखेडे येथे चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यातील सामन्याने आयपीएलचा पंधारावा हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने अचानक संघाच्या नेतृत्त्वपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो यंदाच्या हंगामात केवळ यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. यानंतर त्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
गेली १२ वर्षे सीएसकेचे (Chennai Super Kings) नेतृत्त्व केल्यानंतर अचानक धोनीने (MS Dhoni) ही जबाबदारी अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्या हाती सोपवली आहे. त्याच्या या आश्चर्यजनक निर्णयानंतर धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (MS Dhoni Old Video) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ २०२१ सालचा आहे, जेव्हा सीएसके चौथ्यांदा आयपीएल विजेती बनली होती.
व्हिडिओत दिसते की, धोनी चौथ्यांदा संघाला आयपीएल विजेता बनवल्यानंतर भावूक झाला आहे. आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी तो संघ सहकाऱ्यांना म्हणताना दिसतोय की, ‘जॉब डन (काम पूर्ण झाले).’
धोनीच्या या वाक्यावरून स्पष्ट होते की, आयपीएल २०२१ मध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर लगेचच धोनीने सीएसकेच्या नेतृत्वाचा भार दुसऱ्या कोणत्या खेळाडूकडे सोपवण्याचे ठरवले होते. धोनीच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानेही या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा धोनी म्हणाला होता, जॉब डन. तेव्हाच समजले होते. त्याच्या डोळ्यातील अश्रू तर पाहा.’
When He say – Job done
Tabhi samaj aagya tha..😒
See the tears In his eyes..🥺#MSDhoni #Thankyoudhoni pic.twitter.com/YkI8Zv7i9R— Bhupesh🦁 (@MskkianBhupesh) March 24, 2022
धोनीचा अजून एक व्हिडिओ झाला होता व्हायरल
याव्यतिरिक्त धोनीने सीएसकेच्या नेतृत्त्वपदावरून पायउतार केल्यानंतर आयपीएल २०२१ अंतिम सामना विजयानंतरचा त्याचा अजून व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. हा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अंतिम सामना जिंकल्यानंतरच्या पोस्ट प्रेझेंटेशनमधील होता.
the final words of MS the captain ❤️
pic.twitter.com/skOnAgYRwY— rea (@reaadubey) March 24, 2022
व्हिडिओत समालोचक हर्षा भोगले धोनीला विचारताना दिसत आहेत की,“तू मागील कित्येक वर्षांपासून सीएसके फ्रँचायझीसाठी केलेल्या शानदार कामासाठी तुझे आभार. तू तुझ्यानंतर सीएसकेसाठी मोठा वारसा सोडून जाशील.”
हर्षा भोगलेंच्या भाष्यावर हसत उत्तर देताना धोनी म्हणतो की, “पण मी अजून सीएसकेचे नेतृत्त्वपद सोडलेले नाही.” हे सीएसकेसाठी कर्णधार धोनीने म्हटलेले शेवटचे शब्द होते.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| चेन्नई वि. कोलकाता सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
हे काय? यष्ट्यांवर बेल्स नसतानाच खेळवला गेला विश्वचषक सामना, जाणून घ्या असे करण्यामागचे कारण
पुढचा विराट म्हटला गेलेला उन्मुक्त चंद अचानक गायब कसा झाला?