श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी बाबत नुकतेच सुचक वक्तव्य केले आहे. आयपीएलच्या पुढील हंगामापर्यंत धोनीने फॉर्ममध्ये परतण्यासाठी स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यावर भर द्यावा असे संगकाराचे म्हणणे आहे.
एमएस धोनीप्रमाणेच कुमार संगकाराने देखील बऱ्याच काळापर्यंत यष्टीरक्षक कर्णधार क्रिकेटमध्ये भूमिका बजावली आहे. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन काही वर्षे लोटली आहेत. धोनीने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र सध्या तो आयपीएलचा एक भाग आहे. धोनी गेले १३ हंगाम आयपीएल खेळत असून १२ हंगामात तो संघाचा कर्णधार राहिला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ दोन वर्षे निलंबित असताना धोनीने पुण्याच्या संघाचे कर्णधारपद भूषवले होते. 13 पैकी 11 हंगामात त्याने आपल्या संघाला ‘प्ले ऑफ’ मध्ये नेले होते. 2016 साली पुण्याच्या संघात असताना काही सामन्यांत स्टीव्ह स्मिथ कर्णधार असल्याने त्यावेळी पुण्याचा संघ ‘प्ले ऑफ’ च्या बाहेर राहिला होता. त्यानंतर या वर्षीच्या 2020 च्या हंगामात मात्र चेन्नईचा संघ पहिल्यांदाच ‘प्ले ऑफ’ च्या बाहेर राहिला आहे. म्हणूनच धोनीच्या फॉर्मबाबत संगकाराने त्याला सल्ला दिला आहे.
धोनीने फॉर्ममध्ये परतण्यासाठी खेळावे स्पर्धात्मक क्रिकेट
2019 मध्ये झालेल्या विश्वचषकात धावचीत झाल्यानंतर धोनीने मोठा ब्रेक घेतला होता. तो भारताच्या कोणत्याही संघात अथवा दौऱ्यावर दिसला नाही. कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही त्याने विशेष असा सराव केला नव्हता. त्यामुळे इतक्या मोठ्या कालावधी नंतर मैदानात उतरणे कठीणच. उर्वरीत सामन्यात खेळ सुधारणा करून काहीही साध्य होण्यासारखे नाही. त्यामुळे धोनीने पुढील हंगामा पर्यंत स्पर्धात्मक खेळ करावा. जेणेकरून पुढच्या हंगामात धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये परतू शकतो, असा सल्ला संगकाराने धोनीला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-वैर फक्त मैदानावर! धोनीची दांडी उडवल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घ्यायला गेला चक्रवर्ती, पाहा Video
-CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
-‘पुढच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा करू शकतो का?’ या प्रश्नावर मॅक्सवेलने दिलं भन्नाट उत्तर
ट्रेंडिंग लेख-
-त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
-भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…