नुकतीच ऑस्ट्रेलियामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने कसोटी मालिका सुद्धा जिंकली. चौथ्या सामन्यात शार्दूल ठाकूरच्या शानदार अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्यांनंतर आता शार्दूल ठाकूरने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा खेळाडू शार्दूल ठाकूरला चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी दिली होती. हा सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळला गेला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना शार्दूल ठाकूरने भारतीय संघांकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने या डावात अत्यंत महत्त्वाची अशी 67 धावांची साकारली होती.
त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये ही त्याने आपला करिष्मा दाखवला. त्याने दोन्ही डावात मिळून 7 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदर सोबत सातव्या विकेटसाठी विक्रमी अशी 123 धावांची भागीदारी साकारली. या भागीदारीच्या योगदानामुळे भारतीय संघाने चौथ्या सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे भारतीय संघाने चौथ्या 3 विकेट्सने जिंकत मालिका आपल्या नावावर केली.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतला आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूरने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना शार्दूल ठाकूर म्हणाला हे एवढे यश त्याला महेंद्रसिंग धोनीमुळे मिळाले आहे. तो म्हणाला, “जास्त करून मी त्याला हेच विचारतो, की दबावात कसे खेळले जावे. त्यानी एक खेळाडू, कर्णधार आणि पराभूत होणार्या संघाचा सदस्य म्हणून या गोष्टींचा चांगल्या प्रकारे सामना केला आहे. या शिवाय जिंकणाऱ्या संघाचा सदस्य म्हणून ही त्याला खूप प्रेम मिळते. त्याच्याकडे खूप अनुभव आहे.
एमएस धोनीकडून प्रत्येक दिवशी काही ना काही शिकता येते – शार्दूल ठाकूर
एमएस धोनीचे प्रशंसा करताना शार्दूल ठाकूर म्हणाला की,” जर कोणत्याही क्रिकेटर आपले डोळे आणि कान उघडे ठेवले, तर मग तो एमएस धोनीकडून खूप काही शिकू शकतो. जेव्हा ही धोनी आपले अनुभव शेअर करतो, तेव्हा आम्हाला खूप काही शिकायला मिळते. तो असा व्यक्ती आहे की, जे प्रत्येक दिवशी काही ना काही सांगेल, फक्त तुम्ही एवढे समजदार असायला हवे की, त्याचा अर्थ समजला पाहिजे. जर तुम्ही असे केले, तर मग प्रत्येक दिवशी काही ना काही नक्कीच शिकणार. ”
महत्त्वाच्या बातम्या –
जोश मे खोया होश! कसोटी मालिका विजयाच्या आनंदात रोहितच्या तोंडून निघाले अपशब्द, व्हिडिओ व्हायरल
पुजाराच्या जखमांवर त्याच्या चिमुकलीने शोधला ‘क्यूट’ उपाय, वाचून तुम्हीही व्हाल भावूक