भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच चर्चेत असतो. मागच्या काही दिवसांपासून धोनी आपल्या जुन्या लुकमध्ये पुन्हा परतताना दिसला आहे. त्याने आपले केस आधीप्रमाणे वाढवायला सुरुवात केली आहे. अशातच शनिवारी (30 सप्टेंबर) त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत धोनीने मागच्या बाजूला केस बांधल्याचे दिसत आहेत.
एमएस धोनी () मैदानातील आपल्या प्रदर्शनासाठी चर्चेत राहिलाच. पण त्याच्या लुकसाठीही नेहमीच भारतीय कर्णधाराचे कौतुक केले गेले. आजही चाहते धोनीच्या जुन्या लुकची आठवण नेहमी काढत असतात, जेव्हा तो मोठ्या केसांसह मैदानात खेळत असे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि शेजारी राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनीही धोनीच्या केसांचे कौतुक केले होते. भारतीय संघ 2005-2006 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर होता. मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात धोनीने 72 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला होता. या खेळीनंतर परवेज मुशर्रफ यांनी धोनीच्या केसांबद्दल स्तुती केली होती. मुशर्रफप्रमाणेच धोनीच्या केसांचे कौतुक करणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गजांची नावे आहेत.
आता चाहत्यांना येत्या काही दिवसांमध्ये धोनीचा तोच जुना लुक पाहायला मिळू शकतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये सर्वत्र पोहोचला. व्हिडिओत धोनी आपले केस मागे बांधून घाईत जाताना दिसत आहे. एकंदरीत पाहता, धोनीचा हा लुक चाहत्यांना चांगलाच भावल्याचे दिसते.
The Stylish walk and the Super Cool Hairstyle of Thala Dhoni !! ????????#MSDhoni | #WhistlePodu | #Dhoni
???? via Mohammed pic.twitter.com/gkkVwXCrUB— Saravanan Hari ???????????? (@CricSuperFan) September 30, 2023
दरम्यान, धोनीच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतासाठी वनडे विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. आपल्या संघाला या तिन्ही ट्रॉफी मिळवून देणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. 2004 साली धोनीने भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर कारकिर्दीतील शेवटचा सामना त्याने जुलै 2019 मध्ये खेळला. ऑगस्ट 2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मागच्या काही वर्षांमध्ये तो फक्त इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज हा सर्वात यशस्वी आयपीएल संघ ठरला आहे. धोनीने सीएसकेचे नेतृत्व करताना संघाला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. (MS Dhoni is back in his old look)
महत्वाच्या बातम्या –
“अश्विनच वर्ल्डकपमध्ये आपले ट्रम्पकार्ड ठरणार”, दिग्गजाने व्यक्त केला विश्वास
ना रोहित-विराट, ना बुमराह, ‘हा’ धुरंधर भारताला जिंकून देणार वर्ल्डकप; युवराजने घेतले हैराण करणारे नाव