भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा आपल्या वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असतो. कधी कधी त्याची ही विधाने वादग्रस्त ठरतात तर कधी त्याचे कौतुक होते. असे असतानाच त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्याबद्दल आता एक नवे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केले.
गंभीर व धोनी हे अनेक वर्ष भारतीय संघासाठी एकत्र खेळले आहेत. मात्र काही वेळा गंभीर काही अशी वक्तव्ये करत असतो, ज्यामुळे धोनीचे चाहते निराश होत असतात. मात्र, आता गंभीरने असे एक वक्तव्य केले ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले.
गंभीरने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याला त्याचा आवडता बॅटिंग पार्टनर कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने काही क्षणाचाही विचार न करता थेट एमएस धोनी असे नाव घेतले. तो म्हणाला,
“मी आणि धोनी अनेक वेळा मोठ्या भागीदारांमध्ये सहभागी राहिलो आहोत. अनेक वेळा लोक म्हणतात गंभीर आणि सेहवाग चांगले पार्टनर होते. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मी आणि धोनी नेहमीच एकत्रितरित्या उत्कृष्ट खेळलो आहोत.”
धोनी व गंभीर या जोडीला 2011 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील भागीदारीसाठी नेहमी लक्षात ठेवले जाते. भारतीय संघ अडचणीत असताना त्यांनी संघाला शतकी भागीदारी करून दिली होती. यामध्ये गंभीरने 97 तर धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केलेली.
(MS Dhoni Is My Favourite Batting Partner Gautam Gambhir Said)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: लखनऊला बाय-बाय करत गंभीर पुन्हा केकेआरच्या ताफ्यात, आगामी IPL साठी बनला मेंटर
“एक लाख 30 हजार लोक शांत झाले आणि…” लॅब्युशेनने सांगितला Final मधील ‘तो’ क्षण