डब्लिन। भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध बुधवारी १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला. याबरोबर जगात १०० टी२० सामने खेळणाऱ्या देशांंच्या यादीत भारतीय संघाचा ७वा देश म्हणुन समावेश झाला.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा हा 90 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. तो क्रिकेटच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारात प्रत्येकी 90 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
अनेक खेळाडूंनी क्रिकेटच्या दोन प्रकारात प्रत्येकी 90 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. पण तिन्ही प्रकारात असा कारनामा कोणालाही करता आलेला नाही.
धोनीने आत्तापर्यंत 90 टी20 सामने, 318 वनडे आणि 90 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच तो भारताकडून सर्वाधिक टी20 सामने खेळणारा क्रिकेटपटू देखील ठरला आहे.
याबरोबरच कॅप्टनकूल धोनीच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात नेतृत्व करण्याचाही विक्रम आहे. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 90 टी 20 सामन्यांपैकी 72 सामन्यात भारताचे कर्णधारपद संभाळले आहे.
धोनी भारताने 1 डिसेंबर 2006ला खेळलेल्या पहिल्या टी20 सामन्याचाही भाग होता. विशेष म्हणजे भारतीय संघ बुधवारी जो 100 वा टी 20 सामना खेळला त्याचाही धोनी भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–पाकिस्तान-आॅस्ट्रेलियापेक्षा टी२०मध्ये भारतीय संघच सरस!
–स्मिथचा बियर पितानाच्या व्हायरल फोटोवरुन डॅरेन सॅमी उखडला!
–टाॅप ५- या देशांच्या खेळाडूंनी केल्या आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा