---Advertisement---

वनक्कम ‘थाला’! एमएस धोनीचे आयपीएलसाठी चेन्नईत आगमन, पाहा फोटो

---Advertisement---

चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला काही दिवसातच सुरुवात होईल. नुकताच या हंगामाचा लिलाव मागील महिन्यातच पार पडला आहे. त्यामुळे आता सर्व आयपीएलमधील संघांनी १४ व्या हंगामासाठी तयारी सुरु केली आहे. त्यातच आता आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी चेन्नईमध्ये पोहचला आहे.

याबद्दल चेन्नई सुपर किंग्सने बुधवारी(३ मार्च) रात्री ११.३० च्या सुमारास ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी धोनीचा चेन्नईत पोहचल्याचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत धोनीने पांढरा टी-शर्ट घातला असून तोंडाला मास्क लावले आहे. या फोटोला कॅप्शन दिले आहे की “थलाय-वा! मास्क लावलेले असूनही हास्य लपले नाही! सुपर नाईट!” याबरोबरोच ‘डेन कमिंग’, ‘व्हिसलपोडू’ आणि ‘यलोव्ह’ हे हॅशटॅग दिले आहेत.

सोशल मीडियावर ट्रेंडिंग

मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी चेन्नईला पोहचताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. तसेच #DhoniDefinitelyYes आणि #WhistlePodu हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेक चाहत्यांनी ‘धोनीचे चेन्नईत स्वागत आहे’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असल्याने तो आता केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो.

https://twitter.com/Tharane_Talks/status/1367173665469517825

https://twitter.com/Id_1923/status/1367180860697448449

पुढील आठवड्यात येणार असल्याची होती चर्चा

खरंतर धोनी पुढील आठवड्यात ११ मार्चला चेन्नईत येणार असल्याची चर्चा होती. लवकरच चेन्नईत सीएसके संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरु होणार आहे. त्यासाठी धोनी चेन्नईत पुढील आठवड्यात येणार असल्याचे म्हटले जात होते. पण एक आठवड्यापूर्वीच धोनी चेन्नईत दाखल झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

चेन्नईची आयपीएल २०२०मध्ये निराशाजनक कामगिरी –

चेन्नई सुपर किंग्सची आयपीएलच्या १३ व्या हंगामात खुपच निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यांना १४ मधील केवळ ६ विजयांसह गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. त्यामुळे यंदा मात्र चेन्नईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

आयपीएल लिलावात या खेळाडूंना केले खरेदी 

चेन्नईने आयपीएल २०२१ च्या लिलावात ६ खेळाडूंना खरेदी केले आहे. यात इंग्लंडचा मोईन अली, भारताचे कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, के भगत वर्मा, सी हरी निशांत आणि एम हरिशंकर रेड्डी यांना खरेदी केले आहे.

आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ –

एमएस धोनी (कर्णधार) , फाफ डू प्लेसीस, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायडू, एन जगदीशन, रॉबिन उथप्पा, रविंद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, आर साई किशोर, मिचेल सँटनर, इम्रान ताहिर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडी, जोश हेजलवुड, केएम आसिफ, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरी निशांत.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑन माय वे! भारतीय संघाचा ‘हा’ शिलेदार मैदानात गाळतोय घाम; वनडे मालिकेत करु शकतो पुनरागमन

वॉनचे टिकास्त्र थांबेना! आता ‘हा’ व्हिडिओ शेअर करत साधला अहमदाबादच्या खेळपट्टीवर निशाणा

चौथा कसोटी सामना भारत, इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूंसाठी ठरु शकतो खास, मोठे विक्रम करण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---