संपूर्ण क्रिकेट विश्वातील चाहते १९ सप्टेंबर या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात कोरोना व्हायरसने बायो बबल भेदला होता. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
आता उर्वरित हंगामाला येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेल्या एमएस धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ युएईला रवाना देखील झाले आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीने गुरुवारी (१९ ऑगस्ट) फलंदाजीचा सराव देखील केला होता.
आयपीएल स्पर्धेचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आगळ्या-वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे. त्याने या व्हिडिओमध्ये रंगीबेरंगी कपडे घातले आहे. यासह त्याच्या केसांचा रंग देखील वेगळाच आहे.धोनीचा या हटके व्हिडिओवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. कारण धोनी मैदानावर नेहमी शांत दिसून येत असतो. परंतु, या व्हिडिओमध्ये तो भरपूर उत्साहात दिसून येत आहे.
धोनी या व्हिडिओमध्ये म्हणतोय की, “मेहरबान-साहेबान, आईपीएल के कदरदान. बच्चा पहलवान, इंटरवलनंतर येणार दुसऱ्या टप्प्यातील तुफान, ड्रामा आहे, सस्पेन्स आहे, क्लायमॅक्स आहे, गब्बर आहे, हिटमॅन आहे, हेलिकॉप्टरचा टेक ऑफ आहे, किंग आहे, प्लेऑफ आहे, सुपरओवर आहे, पहिला टप्पा तर झांकी होती, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील असली पिक्चर अजून बाकी आहे.”(Ms dhoni new commercial asli picture abhi baki hai went viral on social media)
🎺🎺🎺 – #VIVOIPL 2021 is BACK and ready to hit your screens once again!
Time to find out how this blockbuster season concludes, 'coz #AsliPictureAbhiBaakiHai!
Starts Sep 19 | @StarSportsIndia & @DisneyPlusHS pic.twitter.com/4D8p7nxlJL
— IndianPremierLeague (@IPL) August 20, 2021
धोनीने आयपीएल २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा सुरू होण्यापूर्वी देखील जाहिरात केली होती. त्यावेळी त्याने साधूची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तो आयपीएलच्या अधिकृत जाहिरातीत झळकणार आहे. तसेच मैदानात देखील चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. चेन्नईने आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ७ सामने खेळले होते, यामध्ये त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
त्यावेळी सिराज हॉटेल रूममध्ये एकटा रडत बसला होता, परंतु मैदानात त्याने कधीच हार मानली नाही
योगायोगाने मिळाली संधी आणि केली कमाल; आता ‘या’ खेळाडूंचा पत्ता कट करू शकतो केएल राहुल
आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच रिषभ पंतला बसू शकतो मोठा धक्का, काय आहे कारण? घ्या जाणून