---Advertisement---

योगायोगाने मिळाली संधी आणि केली कमाल; आता ‘या’ खेळाडूंचा पत्ता कट करू शकतो केएल राहुल

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 1:38 AM
KL-Rahul-and-Rohit-Sharma
---Advertisement---

सध्या भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. आतापर्यंत या मालिकेत भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. ज्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला लॉर्ड्सच्या मैदानावर १५१ धावांनी नमवत मालिकेत ०-१ ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारताच्या फलंदाज आणि गोलंदाज अशा दोन्ही विभागांनी चांगले प्रदर्शन केले. ज्यामुळे भारतीय संघाला लॉर्ड्सच्या मैदानावर विजय मिळवता आला. अशात दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या शतकीय भागीदारीमुळे भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. राहुलने तर या सामन्यात शतक देखील ठोकले. त्यामुळे राहुलचे सर्वत्र कौतुक केले जात होते.

एकेकाळी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे देखील राहुलसाठी अवघड झाले होते. मात्र, इंग्लंड दौऱ्यापूर्वीच शुभमन गिलने दुखापतीमुळे आपले नाव मागे घेतले होते. तर सरावादरम्यान मयंक अगरवाल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात राहुलला संधी देण्यात आली होती. राहुलने देखील भारतीय संघाला आणि चाहत्यांना नाराज केले नाही.

राहुलने आतापर्यंत या मालिकेत ४ डावांमध्ये २४४ धावा केल्या. तसेच लॉर्ड्सवरील शतकीय खेळीमुळे राहुलचे संघातील स्थान पक्के झाले आहे. मात्र, यामुळे राहुलला ज्या खेळाडूंच्या जागेवर खेळायची संधी मिळाली होती, त्याच खेळाडूंच्या खेळण्यावर आता प्रश्न उपस्थित झाला आहे.

राहुलला २०१८ नंतर प्रथमच भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये राहुलचे अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन राहिले. त्यामुळे आगामी कसोटी सामन्यांसाठी गिल आणि अगरवालला संघात स्थान मिळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते. कारण, इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत रोहित आणि राहुलची जोडी जमलेली दिसून आली आहे.

दरम्यान, ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांवर वरचढ होते. मात्र चौथ्या दिवसापर्यंत इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या दीडशतकीय खेळीमुळे इंग्लंडची स्थिती मजबूत झाली होती. इंग्लंडचा संघ हा सामना जिंकण्याच्या स्थितीत होता. मात्र, शेवटच्या दिवशी शमी-बुमराह यांच्या जोडीने ९ व्या विकेटसाठी कमालीची ८९ धावांची भागीदारी केली. ज्यानंतर भारतीय गोलंदाजांनी देखील इंग्लंडवर चांगलेच वर्चस्व गाजवले. ज्यामुळे भारतीय संघाने हा सामना १५१ धावांनी जिंकला.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्ट पासून हेडींग्लेच्या मैदानावर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –
–आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच रिषभ पंतला बसू शकतो मोठा धक्का, काय आहे कारण? घ्या जाणून
–मोहम्मद सिराजला ‘या’ कारणामुळे देण्यात आला नव्हता सामनावीर पुरस्कार, माजी भारतीय क्रिकेटपटूचा खुलासा
–मुंबई, चेन्नई पाठोपाठ सनरायझर्स हैदराबाद संघही यूएईसाठी भरारी घेण्यास सज्ज; ‘या’ दिवशी होणार रवाना

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---