भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. असे असूनही तो नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून धोनीबद्दलची सर्व चाहत्यांना माहिती मिळत असते. काही दिवसांपूर्वीच माही आपल्या नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसून आला होता. त्याचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तर आता माही पुन्हा एकदा रंगीत केसांसह नवीन लूकमध्ये दिसून आला आहे. यावेळी तो टीव्ही अभिनेत्री ध्वनि शहासोबत दिसला आहे.
टीव्ही अभिनेत्री ध्वनि शाहने धोनीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचबरोबर तिने पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी इतक्या नम्र आणि डाउन टू अर्थ सेलिब्रिटीला कधीही भेटले नाही. तो एक स्टार आहे. धोनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना ज्या प्रकारे आदर देतो, ते कौतुकास्पद आहे. मी आयुष्यभरासाठी त्याची चाहती झाले आहे. धोनीसारख्या दिग्गजासोबत शूटिंग करणे हा एक उत्तम अनुभव आहे. लोक माझ्या नावाचा चुकीचा उच्चार करतात. मला ध्वनीऐवजी धोनी म्हणतात. आज मला सर्वांना सांगायचे आहे की, होय मी धोनीची बहीण आहे.’
https://www.instagram.com/p/CSBmJSRq4V0/?utm_source=ig_web_button_share_sheet
या अगोदर धोनी नव्या स्टाईलमध्ये दिसून आला होता. धोनीच्या हेअरस्टाइलिस्ट आलिम हकीमने त्याचे नव्या हेअरस्टाईलचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यामध्ये धोनीचे अनेक फोटो दिसून आले आहेत, ज्यात हेअरस्टाइलिस्ट आलिम हकीम देखील दिसत होता.
धोनीने नवनव्या हेअरस्टाईलने चाहत्यांना केले अचंबित
तसे तर धोनी नेहमीच आपल्या केसांचे वेगवेगळ्या स्टाईल करत असतो. अनेकवेळा त्याने आपल्या हेअर स्टाईलने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. जेव्हा माहीने क्रिकेटची कारकीर्द सुरू केली, तेव्हा त्याचे लांब केस होते. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनीही त्याच्या केसांचे कौतुक केले होते. त्यानंतर विश्वचषकानंतर धोनीने मुंडन केले होते. त्यानंतर तो स्टायलिश दाढी आणि मिशीसह एका नव्या स्टाईलमध्ये दिसून आला होता.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई-चेन्नई संघात
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. यावेळी आयपीएलला कोरोनामुळे २९ सामन्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. आता आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खेळले जाणार आहेत. याच दरम्यान धोनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मैदानावर दिसून येणार आहे. १९ सप्टेंबरला या उर्वरित सामन्यांपैकी पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ये चाँद सा रोशन चेहरा’ गाण्यावर विराटचा अनुष्कासंगे रोमँटिक डान्स; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वाह!’
कर्णधार विराटकडे क्रिकेटविश्वातील अव्वल ‘शतकवीर’ बनण्याची संधी; ‘हे’ विक्रमही असतील निशाण्यावर
टीम इंडियाचे ‘हे’ ३ शिलेदार भविष्यात घेऊ शकतात कर्णधार कोहलीची जागा