भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आणखी एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत धोनी एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. धोनीने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे आणि त्याची दाढी पांढरी दिसत आहे.
तसेच धोनी (MS Dhoni) आपली मुलगी झिवा (Ziva) आणि पत्नी साक्षी धोनीबरोबर (Sakshi Dhoni) वेळ घालवताना दिसत आहे. यामध्ये त्याचा कुत्रादेखील धोनी आणि झिवाबरोबर खेळत आहे.
धोनीच्या या व्हिडिओमध्ये एक मजेशीर गोष्ट पहायला मिळाली. त्याचे सर्वकाही ऐकणारा कुत्रा आता त्याचे नाही तर साक्षी जे सांगेल ते ऐकत आहे. धोनी आपल्या अंगणामध्ये बसला असून त्याने चेंडू वर फेकला असता ते त्याच्या कुत्र्याने झेलला नाही.
जेव्हा साक्षीने आपल्या कुत्र्याला बसण्यासाठी सांगितले, तेव्हा तो खाली बसला. त्यानंतर साक्षीने कुत्र्याला उडी मारून झेल झेलण्यास सांगितले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणे केले. तरी शेवटी कुत्रा धोनीच्या जवळ जाऊन बसतो. धोनीच्या या कुत्र्याचे नाव सॅम आहे.
Thala Dhoni in #yellove, dot. #WhistlePodu 🦁💛 VC: @SaakshiSRawat pic.twitter.com/z4FrGumlxC
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 11, 2020
धोनीचा पांढऱ्या दाढीतील लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. धोनीचा फोटो रविवारी (१० मे) व्हायरल झाला होता. तो फोटो पाहून चाहत्यांनी म्हटले होते की, “सिंह म्हातारा झाला आहे. परंतु शिकार करणे विसरला नाही.”
धोनी आयपीएल (IPL) २०२०च्या १३ व्या हंगामातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे चाहत्यांना धोनीच्या पुनरागमनाची आणखी वाट पहावी लागणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-व्हिडिओ: रमझानमध्ये इरफानकडून घडली मोठी चूक; रोजा असतानाही…
-रागारागात मैदानावर आलेल्या धोनीने सामन्यानंतर मागितली माफी
-एवढी चांगली वनडे कारकिर्द असतानाही रोहितला आहे या गोष्टीची खंत