भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील तो ताईत आहे, असे म्हणायला देखील हरकत नाही. मात्र असे असले तरी धोनीला आपले वैयक्तिक जीवन खाजगीच ठेवायला आवडते. इतर खेळाडूंसारखा तो सोशल मिडीयावर सातत्याने सक्रिय नसतो.
ट्विटर आणि इंस्टाग्राम या दोन्ही सोशल मिडीयावर धोनीला फॉलो करणार्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. पण धोनी या दोन्ही ठिकाणी फारशा पोस्ट शेअर करतांना दिसत नाही. त्याने ट्विटरवर शेवटची पोस्ट ८ जानेवारी रोजी केली होती. मात्र सध्या धोनी फारसा सक्रिय नसला तरी पूर्वी तो सोशल मिडीयावर सक्रिय होता. २०१३ साली त्याने केलेल्या एका ट्विटने धमाल उडवली होती.
दुधाच्या किमतीवर केले भन्नाट ट्विट
धोनीने २०१३ साली रांचीतील दुधाच्या किमतीवर ट्विट करत धमाल उडवून दिली होती. झाले असे होते की त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वेस्ट इंडिज मधील तिरंगी मालिका जिंकून धोनी रांचीतील आपल्या घरी परतला होता. धोनीला विश्रांति दिल्याने भारतीय संघ त्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेमध्ये मालिका खेळत होता. त्यावेळी धोनीने ट्विटरवर चक्क दुधाच्या किमतीबाबत ट्विट केले होते.
धोनीने केले होते की, ‘रांचीत जर दुधवाला तुमच्या घरी येऊन दूध देणार असेल तर तो ३२ रुपये किंमतीला ते विकतो. मात्र जर तुम्ही त्याच्याकडे जाऊन दूध विकत घेतले तर तो दुधाची किंमत ३४ रुपये सांगतो.’ मात्र त्याकाळी ट्विटरचा फारसा ऊपयोग होत नसे. त्यामुळे धोनीच्या या ट्विटची फारशी चर्चा झाली नव्हती.
In Ranchi if the milkman delivers milk to ur house he charges 32 rs but if u go and pick it from his place he asks for 34 rs.
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) August 1, 2013
धोनी पुन्हा दिसणार आयपीएलमध्ये
एमएस धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र त्याने आयपीएल मध्ये खेळणे चालू ठेवले होते. आयपीएलच्या २०२१च्या हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने दमदार कामगिरी केली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा हंगाम मध्यातच स्थगित झाला होता. आता येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा धोनीला मैदानात खेळतांना बघता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
इंग्लंड वि न्यूझीलंड: दोन्ही संघांच्या सलामीवीरांनी केली ७० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
सौरव गांगुलीच्या मुलीबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? ऑक्सफर्ड विद्यापीठातून घेतलंय शिक्षण






