---Advertisement---

मागील हंगामातील ‘ही’ गोष्ट सुधारल्याने यंदा कामगिरीत सुधारणा, धोनीने उलगडले कारण

On: गुरूवार, एप्रिल 29, 2021 2:02 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बुधवारी (२८ एप्रिल ) झालेल्या सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ गडी राखून पराभूत केले. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघ उल्लेखनीय कामगिरी करत आहे. या संघाने सलग ५ सामने जिंकून पुन्हा एकदा गुणतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे. हा सामना झाल्यानंतर धोनीने आयपीएल २०२० मध्ये केलेल्या निराशाजनक कामगिरी बद्दल भाष्य केले आहे.

“ड्रेसिंग रूमचे वातावरण योग्य ठेवणे फार महत्वाचे” 
सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत धोनी म्हणाला की, “फलंदाजी चांगली होती याचा अर्थ हा नाही की, गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. तसेच दव आलेच नाही. मला असे वाटते की, आम्ही संघ निश्चित केला आहे. गतवर्षी आम्ही ५ ते ६ महिने क्रिकेटपासून दूर होतो. मला वाटते की खेळाडूंनी आपली जबाबदारी समजून घेतली आहे. जर तुम्ही पाहाल तर, गेल्या १० वर्षात आम्ही जास्त बदल केले नव्हते. आम्ही बाहेर बसलेल्या खेळाडूंवरही तितकेच लक्ष ठेवतो. ड्रेसिंग रूमचे वातावरण योग्य ठेवणे फार महत्वाचे असते.”

गतवर्षी केलेल्या निराशाजनक कामगिरीबद्दल व्यक्त झाला धोनी
“गतवर्षी आम्ही ६ ते ७ महिने क्रिकेट खेळले नव्हते. तुम्हाला कुठेही जाण्याची परवानगी नव्हती, तुम्हाला बाहेर जाऊन सरावदेखील करता येत नव्हता. यामुळे, बर्‍याच समस्या आल्या. यावर्षी विलगीकरणाच्या नियमात बदल झाला होता. मात्र गेल्या वर्षी विलगीकरणात बराच काळ मुक्काम होता. जर मी म्हणालो तर यावर्षी खेळाडूंनी अधिक जबाबदारी स्वीकारली आहे. याक्षणी परिस्थिती काही वेगळी आहे, परंतु प्रत्येक खेळाडू त्याचे योगदान कसे देईल यावर अवलंबून आहे”, असे धोनी म्हणाला.

दरम्यान काळ झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मनीष पांडेने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली होती. तर डेविड वॉर्नरने महत्वाच्या ५८ धावा केल्या होत्या. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटक अखेर १७१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वधिक ७५ धावांची खेळी केली. तर फाफ डू प्लेसिसने ५६ धावा केल्या होत्या. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला.

महत्वाच्या बातम्या:

राजस्थानचे रॉयल्स भिडणार मुंबईच्या पलटणला! पाहा कशी असेल आजच्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने घेतला हा मोठा निर्णय

आनंदाची बातमी! धोनीच्या आई-वडिलांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---