भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला असला तरीही त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. तो इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसुन येतो. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे निवृत्ती घेतल्यानंतरही त्याची लोकप्रियता वाढली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशातच सध्या सुट्टीचा आनंद घेत असलेल्या एमएस धोनीसोबत ‘फॅन मुमेंट’ घडल्याचे दिसून आले आहे.
एमएस धोनी सध्या हिमाचल प्रदेशच्या रत्नारीमध्ये आपल्या कुटुंबासमवेत सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे. या ठिकाणी तो मीनाबाग हॉटेलमध्ये थांबला आहे. या हॉटेलमधील एक स्टाफ सदस्य धोनीचा खूप जुना चाहता निघाला आहे. (ms dhoni pics his fan went viral on social media )
Dhoni enjoying holiday with his friends ❤️@MSDhoni | #MSDhoni | #WhistlePodu pic.twitter.com/W0XYVoqgDk
— DHONI Trends™ (@TrendsDhoni) June 19, 2021
https://www.instagram.com/p/CQYrUI3HGQs/?utm_source=ig_web_copy_link
धोनीची भेट घेण्यासाठी करून घेतली बदली
मीनाबाग हॉटेलमध्ये तो दिवस खूप आनंदाचा दिवस होता. कारण हॉटेल स्टाफच्या सदस्यांची भेट कॅप्टनकूल एमएस धोनीसोबत झाली होती. परंतु या स्टाफमध्ये एक देव नावाचा सदस्य होता, त्याच्यासाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता. गेल्या १३ वर्षांपासून तो एमएस धोनीला भेटण्याची वाट पाहत होता. अखेर त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. धोनीला भेटण्यासाठी या पठ्ठयाने आपली बदली शिमलाहुन रत्नारीला करून घेतली होती.
धोनीला भेटण्याची २००८ पासून पाहतोय वाट
एमएस धोनी २००८ मध्ये एक क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हिमाचलच्या रोहरूमध्ये गेला होता. त्यावेळी हा धोनीचा चाहता तिथेच उपस्थित होता, परंतु पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने त्याची आणि धोनीची भेट होऊ शकली नव्हती.
https://www.instagram.com/p/CQ48rX4pf9u/?utm_source=ig_web_copy_link
धोनीने दिला ऑटोग्राफ
अखेर १३ वर्षे वाट पाहिल्यानंतर देवचे स्वप्न खरे झाले आहे. त्याची धोनीला भेटण्याची इच्छा तर पूर्ण झालीच. याशिवाय धोनीने मोबाईलच्या कव्हरवर त्याला ऑटोग्राफ देखील दिला. याचे काही फोटो मीनबाग हॉटेलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
असा देवमाणूस, ज्याने भारतीय संघाला शिकवले सामने जिंकण्याचे ‘सायन्स’
वयाच्या ३७व्या वर्षीही ‘हा’ गोलंदाज टी२०त ठरतोय सुपरहिट, गाजवणार येता विश्वचषक!
एकेकाळच्या जग्गजेत्या श्रीलंकन संघाची आज का झाली आहे दारूण अवस्था? घ्या जाणून






