---Advertisement---

धोनीने चेन्नईत खेळला अखेरचा सामना? चेपॉकवर फेरी मारत चाहत्यांना म्हणाला, “थॅन्कू”, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, मे 15, 2023 7:53 AM
---Advertisement---

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. रविवारी (दि. 14 मे) पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता संघाने चेन्नईला 6 गडी राखून पराभूत केले. चेन्नईचा आपल्या घरच्या मैदानावरील हा हंगामातील अखेरचा सामना होता. या सामन्यानंतर चेन्नईचा संपूर्ण संघ मैदानावर फेरी मारताना दिसून आला.

चेन्नईला आपल्या घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात पराभव पहावा लागला. असे असले तरी दरवर्षीप्रमाणे घरच्या मैदानावरील अखेरचा सामना झाल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी चेपॉक स्टेडियमवर आलेल्या चाहत्यांचे अभिवादन करत, त्यांना भेट वस्तूंचे वाटप केले. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याच्या नेतृत्वात सर्व संघाने मैदानाला फेरी मारली. यावेळी खेळाडूंची सही असलेले चेंडू, जर्सी आणि विविध भेटवस्तूंचे वाटप केले गेले.

 

धोनी याचा हा चेन्नईमधील अखेरचा साखळी सामना होता. चेन्नईने आता प्ले ऑफ्ससाठी पात्रता मिळवली तर त्यांना या मैदानावर आणखी एक सामना खेळायला मिळू शकतो. कारण, क्वालिफायर एक व एलिमिनेटर सामन्यांचे यजमानपद चेन्नईला मिळाले आहे. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या धोनीचा हा अखेरचा हंगाम असू शकतो.

या सामन्याचा विचार केल्यास धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, केकेआरच्या गोलंदाजांपुढे त्याचा हा निर्णय काहीसा चुकीचा ठरला. केकेआरच्या सर्वच गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत चेन्नईला 144 पर्यंत रोखले होते. शिवम दुबेने सर्वाधिक 48 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खराब झाली. पहिल्या पाच षटकात त्यांनी तीन बळी गमावले होते. मात्र, नितीश राणा व रिंकू सिंग यांनी अर्धशतके झळकावत संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला. चेन्नईचा अखेरचा साखळी सामना दिल्ली येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होईल.

(MS Dhoni Play His Last League Match At Chepauk Stadium Say Thank You After Match Against KKR)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
विराटकडून युवा जयसवालला गुरुमंत्र! सामन्यानंतर खास टिप्स देताना दिसला ‘किंग’, पाहा व्हिडिओ
हा तर RCBचा धोनी! भावाने स्टंप्सकडे न पाहताच अश्विनला केले यष्टीचीत, ‘नो लूक’ Runout व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---