अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर सोमवारी (१९ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२०चा ३७वा सामना झाला. या दोन्ही संघांनी आतापर्यंत या हंगामात खेळलेल्या ९ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यात पराभूत होणारा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणार होता. पण चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीसाठी हा सामना एका वेगळ्या कारणामुळे आठवणीत राहण्याजोगा ठरला. कारण हा अटीतटीचा सामना धोनीचा आयपीएल कारकिर्दीतील २००वा सामना होता.
यासह धोनी हा आयपीएलच्या इतिहासात २०० सामने खेळणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. २००८ साली आयपीएलमध्ये पदार्पण केलेला हा धुरंधर आतापर्यंत सातत्याने आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने चेन्नई आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून एकूण २०० सामने खेळत त्याने ४५६८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २३ अर्धशतकांचा समावेश आहे.
धोनीव्यतिरिक्त या विक्रमाच्या यादीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दूसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १९७ सामने खेळले आहेत. तर सुरेश रैना १९३ सामने, दिनेश कार्तिक १९१ सामने आणि विराट कोहली १८६ सामन्यांसह या यादीत टॉप-५ मध्ये आहेत.
धोनीने केल्या चेन्नईकडून ४ हजार धावा-
एमएस धोनीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ४ हजार धावा करण्याचा पराक्रम केला. सीएसकेकडून खेळताना धोनीने १७० सामन्यात ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीने बेंगलोर संघाकडून खेळताना ५७५९ धावा, सुरेश रैनाने चेन्नईकडून ४५२७ धावा, एबी डिविलीयर्सने बेंगलोरकडून ४००९ धावा व रोहित शर्माने मुंबईकडून ४००१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: कमालच म्हणायची! यापूर्वीही मयंक अगरवालने अडवलाय शानदार सिक्सर
‘थाला फक्त एकच…’, चाहत्याच्या कमेंटवर केएल राहुलचे भन्नाट प्रत्युत्तर
सुपर ओव्हरही टाय झाली तर पुढची सुपर ओव्हर कशी टाकायची? ‘असे’ आहेत आयसीसीचे नियम
ट्रेंडिंग लेख-
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’