आयपीएल 2025 पूर्वी आयपीएलप्रेमींना सर्वात मोठा पडलाय की, चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनी येत्या हंगामात खेळणार की नाही? हा प्रश्न गेल्या अनेक आठवड्यांपासून सतत विचारला जात होता. आता अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. सीएसकेचा दिग्गज धोनी पुढच्या हंगामातही ‘पिवळ्या जर्सी’मध्ये परतत आहे. धोनीने स्वतः याची घोषणा केली असून सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीही याला दुजोरा दिला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, धोनी पुढील आयपीएल हंगामात देखील खेळताना दिसणार आहे. धोनीच्या व्हायरल व्हिडिओनंतर या निर्णयाची पुष्टी करणाऱ्या फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या हवाल्याने हे सांगण्यात आले आहे. विश्वनाथन म्हणाले की, जर धोनी तयार असेल तर फ्रँचायझी देखील आनंदी आहे कारण त्यांना हेच हवे आहे. धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की त्याला त्याच्या कारकिर्दीच्या उर्वरित वर्षांत क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे.
गेल्या 2-3 हंगामात धोनीच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत सतत शंका निर्माण होत आहे. प्रत्येक हंगामानंतर तो पुढच्या मोसमात परतणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2023 मध्ये सीएसके आयपीएल विजेता बनल्यानंतरही असे मानले जात होते की कदाचित तो निवृत्त होईल. परंतु चाहत्यांच्या मागणीनुसार धोनीने 2024 च्या मोसमात पुनरागमन केले परंतु यावेळी त्याने कर्णधारपद सोडले आणि ही जबाबदारी रुतुराज गायकवाडकडे दिली. मात्र, शेवटचा हंगाम संघासाठी चांगला राहिला नाही आणि सीएसके प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही.
धोनीला किती पगार मिळेल?
आयपीएलच्या नव्या नियमानुसार, धोनीला आयपीएल 2025 मध्ये किती पगार मिळेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले जाऊ शकते, ज्यामुळे फ्रँचायझीला त्याच्यासाठी फक्त 4 कोटी रुपये खर्च करावे लागतील. बीसीसीआयने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी जुना नियम पुन्हा लागू केला आहे, ज्याच्या अंतर्गत कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन 5 वर्षे झाली असतील किंवा गेल्या 5 वर्षांपासून कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्याच्या प्लेइंग 11 चा भाग असेल तर, त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येईल.
हेही वाचा –
कसोटी मालिका गमावल्यानंतरही रोहितला नाही डब्ल्यूटीसी फायनलची चिंता! दिली अशी प्रतिक्रिया
कसोटी मालिका पराभवास विराट-रोहितसह प्रशिक्षक गंभीरही जबाबदार! जाणून घ्या त्यामागची कारणे
फलंदाजीत पुन्हा फेल ठरल्यानंतर विराटला राग अनावर, बॉक्सवर आपटली बॅट – Video