भारताने गेल्या 12 वर्षांपासून मायदेशात कोणतीही कसोटी मालिका गमावलेली नव्हती. सलग 18 मालिका जिंकणे हा एक मोठा विक्रम होता. मात्र, न्यूझीलंडने ही साखळी 2024 मध्ये संपुष्टात आणली. न्यूझीलंड संघाने प्रथम बेंगळुरूमध्ये 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर पुण्यातही टीम इंडियाचा 113 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. जेव्हा संघ हरतो तेव्हा त्याचा दोष वरिष्ठ खेळाडूंवर टाकला जातो. या मालिकेतील टीम इंडियाच्या पराभवात विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत प्रशिक्षक गौतम गंभीरचाही तितकाच वाटा आहे. त्याचेच काही निर्णय संघासाठी हानिकारक ठरले.
भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण भारताची अत्यंत आक्रमक खेळण्याची शैली म्हणता येईल. प्रशिक्षक गौतम गंभीर अशा आक्रमक पद्धतीसाठी ओळखला जातो. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी गंभीर म्हणाला होता की, आम्हाला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळायचे असले तरीही आम्ही फक्त जिंकण्यावर लक्ष केंद्रित करू. इंग्लंडही त्याच आक्रमक विचाराने कसोटी क्रिकेट खेळत आहे. ज्याला ‘बॅझबॉल’ म्हणतात. परंतु, अत्यंत आक्रमक विचारसरणीमुळे आज इंग्लंड डब्ल्यूटीसी गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानावर आहे आणि अंतिम फेरीच्या जवळपासही नाही. या पराभवातून धडा घेत प्रशिक्षक गौतम गंभीर यांना जास्त आक्रमक न होता आक्रमकतेने आणि समजूतदारपणे क्रिकेट खेळण्याचे वातावरण निर्माण करावे लागेल.
बंगळुरू कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्फराज खानने शतक झळकावले. मात्र दुसऱ्या कसोटीत शुबमन गिलचे पुनरागमन झाल्यानंतर सर्फराजला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी देण्यात आली. भारताचा पहिला डाव 156 धावांवर आटोपला. संघ आधीच बॅकफूटवर होता, त्यामुळे प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाने दुसऱ्या डावात फलंदाजीत वॉशिंग्टनला सहाव्या स्थानावर पाठवले. जिथे संघात स्थैर्य राखण्याची गरज होती, तिथे सर्फराजचा फलंदाजी क्रमांक बदलणारे प्रशिक्षक त्याच्यावर दबाव वाढवत होते.
हेही वाचा –
फलंदाजीत पुन्हा फेल ठरल्यानंतर विराटला राग अनावर, बॉक्सवर आपटली बॅट – Video
“प्रत्येक सामना अश्विन आणि जडेजानेच जिंकवला पाहिजे असे नाही”, कर्णधार रोहितकडून अष्टपैलूंची पाठराखण
टीम इंडियाची वाट बिकट! आता WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जिंकावे लागतील इतके सामने