एमएस धोनी याला मैदानात खेळताना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आगामी आयपीएल हंगामात धोनी त्याचा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खेळेल, पण त्याआधी त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत धोनी त्याच्यापेक्षा युवा खेळाडूंसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओ रांचीतील असल्याचे बोलले जात आहे.
एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच सीएसके (CSK) आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ बनला. धोनीने सीएसकेसाठी आतापर्यंत एकूण चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या. आयपीएलच्या आगामी हंगामात धोनी त्याच्या आयपीएल निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. होम ग्राउंड म्हणजेच रांचीमध्ये चाहत्यांच्या समोर आयपीएल निवृत्ती घेऊ इच्छित असल्याचे त्याने स्वतः म्हणटले आहे. मागच्या काही हंगामांपासून धोनीच्या निवृत्तीविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचेही आपल्याला पागायला मिळते.
अशात आगामी आयपीएल हंगामा धोनी आणि त्याच्या चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने खास असू शकतो. या हंगामात धोनीने चांगले प्रदर्शन केले, तर चाहत्यांसाठी यापेक्षा मोठी भेट काही नसेल. धोनी देखील चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरण्यासाठी सरावाला लागला आहे. सराव सत्रातील त्याचे यापूर्वीही काही व्हिडिओ समोर आले होते, पण या व्हिडिओत धोनीने दोन जबरदस्त षटकार मारल्याचे पाहायला मिळते. व्हिडिओत पाहायला मिळत आहे की, युवा खेळाडूं किंवा अगदी लहान मुले म्हटले तरी चालेल, जी धोनीला चेंडू टाकत आहेत. धोनीने या दोन चेंडूंवर दोन उत्कृष्ट षटकार मारले. चाहत्यांच्या धोनीकडून असलेल्या अपेक्षा या व्हिडिओमुळे अधिकच वाढल्या असून व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
MS Dhoni smashing 6s during today’s practice session! #Dhoni #IPL2023 #CSK @msdhoni pic.twitter.com/ZiVROmMVs4
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) January 30, 2023
दरम्यान, धोनी फक्त आयपीएलच नाही भारतीय संघाचा देखील दिग्गज कर्णधार राहिला आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसी वनडे विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा स्पर्धा जिंकल्या आहेत. भारतीय संघासाठी सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा मान धोनीच्याच नावावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या टी-20 माविकेचा पहिला सामना रांचीमध्ये खेळला गेला. उभय संघांतील या सामन्याआधी धोनीने भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये भेट दिला आणि त्याच्या जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. (MS Dhoni practiced with kids ahead of IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अहमदाबादमध्ये पोहोचताच टीम इंडियाचे जंगी स्वागत, पण ईशानने दिला पृथ्वीला त्रास; व्हिडिओ पाहाच
व्हाईट बॉलमध्ये वॉर्नर-स्टॉयनिस, तर कसोटीत स्मिथ बनला प्लेअर ऑफ द ईयर, महिलांमध्ये बेथ मुनीने सर्वोत्तम