दुबई | आज (२१ सप्टेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आशिया कपमधील सुपर ४चा पहिला सामना होत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला एक खास विक्रम करण्याची संधी मिळणार आहे. बांगलादेशविरुद्ध वनडेत ५०० धावा करणारा चौथा भारतीय खेळाडू बनण्यासाठी त्याला केवळ ३५ धावांची गरज आहे.
त्याने बांगलादेशविरुद्ध १८ सामन्यात ५१.६६च्या सरासरीने ४६५ धावा केल्या आहेत.
भारताकडून वनडेत बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने ११ वनडे सामन्यात ८१.७५च्या सरासरीने ६५४ धावा केल्या आहेत.
तर दुसऱ्या स्थानावर गौतम गंभीर असुन त्याने ११ सामन्यात ५९२ धावा केल्या आहेत. केवळ विराट, गंभीर आणि सेहवाग यांनाच बांगलादेशविरुद्ध ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत.
बांगलादेशविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू-
६५४- विराट कोहली (सामने- ११)
५९२- गौतम गंभीर (सामने- ११)
५०३- विरेंद्र सेहवाग (सामने-१२)
४९६- सचिन तेंडूलकर (सामने- १२)
४८१- सुरेश रैना (सामने- १३)
४६५- एमएस धोनी (सामने- १८)
महत्त्वाच्या बातम्या:
–या कारणामुळे सुनील गावस्करांनी फकार जामन आणि दिनेश कार्तिकला सुनावले खडेबोल
–धोनीच्या त्या निर्णयामुळे माझे आयुष्य बदलले- केदार जाधव