कुलदीप यादव उत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक गणला जातो. त्याच्या आणि युजवेंद्र चहलच्या फिरकी जोडीने मिळून गेल्या काही वर्षात भारतीय संघाला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेकदा मोठे विजय मिळवून दिले. त्यांच्या जोडीला या जोडीला कुल्चा (KulCha) या नावाने ओळखलं जात होतं. याच जोडीतील कुलदीपचा मंगळवारी (१४ डिसेंबर) वाढदिवस होता.
तो वनडे क्रिकेटमध्ये २ हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये जलद १०० विकेट्स घेणाऱ्या १५ गोलंदाजांमध्ये सामील आहे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमसुद्धा केला आहे. पण कुलदीपच्या कारकिर्दीतील गेली २ वर्षे त्याच्यासाठी चांगली राहिली नाहीत.
त्याच्या कामगिरीत गेल्या २ वर्षांत घसरण झाली आणि परिणामी त्याला त्याचे भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले. आता सध्या तो भारतीय संघात पुनरागमनासाठी संघर्ष करताना दिसतो. तसेच मागील काही महिन्यांपासून तो दुखापतग्रस्त सुद्धा आहे. या तरुण खेळाडूच्या कारकिर्दीत अचानक घसरण का झाली हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
कुलदीप यादव एकदा एका मुलाखतीत म्हणाला त्याच्या कारकिर्दीतल्या घसरणीचं कारण एमएस धोनी याची (MS Dhoni) निवृत्ती घेणं आहे. कुलदीप म्हणाला धोनीच्या निवृत्तीनंतर त्याचं मार्गदर्शन आणि सल्ला बंद झालं. त्याला अजूनही धोनीच्या सल्ल्याची उणीव भासते. धोनीच्या मार्गदर्शनामुळे त्याला गोलंदाजी करताना खूप मदत व्हायची आणि तो विकेट्स घेऊ शकत होता.
एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कुलदीपला अजूनही मैदानावर खेळताना धोनीची आठवण येते.
कुलदीप यादवला बीसीसीआयने सुद्धा ट्वीट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. कुलदीप आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये खेळताना पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रहाणेला पुन्हा उपकर्णधार बनवा”; दिग्गजाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी केली मागणी
ना विराट… ना रोहित… ‘हा’ असणार भारताचा नवा कर्णधार? बीसीसीआय देणार मोठा धक्का?
प्रियांक पांचालच्या निवडीमूळे संतापला माजी खेळाडू; म्हणाला, “हा त्या खेळाडूवर अन्याय…”