---Advertisement---

‘ती’ गोष्ट घडली नसती तर टीम इंडियाला धोनी कधी भेटलाच नसता

On: बुधवार, जुलै 7, 2021 3:30 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज माजी फलंदाज धोनीला आपण एक यशस्वी कर्णधार, उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि शानदार फिनिशर म्हणून ओळखतो. हाच धोनी आज त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा धोनीचे आगमन झाले, तेव्हा त्याने भारतीय संघाच्या सर्वात मोठ्या कमतरतेला दूर केले होते. ती म्हणजे यष्टीरक्षणाची. त्याने भारतीय संघाला संतुलन प्राप्त करून दिले. धोनीपूर्वी भारतीय संघातील अनेक खेळाडूंना यष्टीरक्षणांना आजमिवण्यात आले. परंतु ती समस्या काही दूर झाली नाही. त्यामुळे ‘द वॉल’ राहुल द्रविडला यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळावी लागली. धोनीच्या आगमनाने भारतीय संघाची यष्टीरक्षणाची कमकुवत बाजू ही संघाची जमेची म्हणजेच मजबूत बाजू बनली.

परंतु तुम्हाला हे माहितेय का, की भारतीय संघाला नाव मिळवून देणाऱ्या धोनीला सुरुवातीला क्रिकेटपटू बनायचे नव्हते. त्याला फुटबॉल हा खेळ सर्वाधिक आवडायचा. जर असा विचार केला की, धोनी हा ‘हिरा’ भारतीय संघाला मिळालाच नसता, तर काय झाले असते? कदाचित या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती असेल.

७ जुलै १९८१ साली रांचीत जन्मलेला धोनी लहानपणी फुटबॉल संघात होता. याव्यतिरिक्त तो बॅडमिंटन हा खेळही खेळायचा. तसं पाहिलं, तर क्रिकेटशी त्याचं फारसं नातं नव्हतं तसेच त्याला क्रिकेट खेळायचेही नव्हते. रांचीच्या जवाहर विद्यालय मंदिर, श्यामलीमधून शालेय शिक्षण पूर्ण करणारा धोनी फुटबॉल संघात गोलकीपरची भूमिका सांभाळायचा.

ही गोष्ट आहे १९९२ सालची. तो सहावीत शिकत होता, तेव्हा शाळेतील क्रिकेट संघाला यष्टीरक्षकाची आवश्यकता होती. धोनीचे लहानपणीचे क्रीडा शिक्षक केशव बॅनर्जी यांना धोनीची आठवण झाली. त्यांनी असा विचार केला की, हा मुलगा फुटबॉलला रोखू शकतो, तर क्रिकेटचा चेंडूही नक्कीच रोखेल म्हणजेच यष्टीरक्षणही करेल. यानंतर त्यांनी धोनीला मैदानावर उभे केले. त्यानंतर धोनीने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही.

यष्टीरक्षक म्हणून केली धडाकेबाज कामगिरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा धोनीचे आगमन झाले, तेव्हा यष्टीरक्षणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. धोनीकडे गोलकीपिंगचे तंत्र होते. त्यामुळे अनेकांना असे वाटत होते की, यामुळे त्याला खूप संघर्ष करावा लागेल. परंतु असे काहीच घडले नाही. त्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्व लोकांचे तोंड आपल्या कामगिरीने बंद केले. त्याने यष्टीरक्षणावर खूप काम केले आणि जगातील अव्वल यष्टीरक्षकांमध्ये आपल्या नावाची मोहोर लावली.

यष्टीरक्षक म्हणून यष्टीरक्षक फलंदाज धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये ९० सामने खेळताना २५६ झेल घेतले आणि ३८ यष्टीचित केले. सोबतच वनडे क्रिकेटमध्ये त्याने ३५० सामने खेळताना ३२१ झेल घेतले आणि १२३ यष्टीचित केले. याव्यतिरिक्त त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ९८ सामने खेळताना ५७ झेल घेतले आणि ३४ यष्टीचित केले.

महत्त्वाच्या बातम्या-

Blog: हॅप्पी बर्थडे धोनी- रांची का छोकरा ते कॅप्टनकूल माही

एमएस धोनीचे कर्णधार म्हणून घेतलेले खतरनाक ३ निर्णय, ज्यांनी सामना एकहाती फिरवला

अशा ५ घटना, ज्यामुळे धोनीने जिंकलं क्रिकेटप्रेमींचं मनं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---