भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनी हा आपल्या सफाईदार यष्टीरक्षणासाठी प्रसिध्द आहे. धोनीने आपल्या शानदार यष्टीरक्षणाने खेळांडूच्या मनात धाक निर्माण केला. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजावर धोनीचा विशेष दबाव असतो.
कर्णधार विराट कोहली असो किंवा रोहित शर्मा असो क्षेत्ररक्षणात कुठे बदल आवश्यक आहेत यासाठी धोनीचा सल्ला घेताना दिसतात. ही गोष्ट सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या एशिया कपमध्येही दिसून आली आहे. रोहित धोनीशी सल्लामसलत करताना दिसत आहे.
21 सप्टेंबरसा बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही धोनीने रोहितला क्षेत्ररक्षणात बदल करायला लावला आणि त्याच्या नंतरच्या दुसऱ्याच चेंडूवर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल-हसन शिखर धवनच्या हातात झेल देऊन बाद झाला.
कालच्या (23 सप्टेंबर) पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज इमाम-उल-हक फलंदाजी करत असताना सामन्य़ाच्या आठव्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
पण मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. बरोबर स्टम्पच्या मागे उभा असलेेल्या धोनीने तो पायचीत असल्याचे ओळखले आणि रोहितला रिव्हू घ्यायचा सल्ला दिला. त्यामध्ये इमाम पायचीत असल्याचे दिसून आल्यानंतर त्याला बाद ठरवण्यात आले.
या माजी भारतीय कर्णधार धोनीच्या बाबतीत हे पहिल्यांदाच झाले नाही तर त्याचे रिव्हू फार कमी वेळा वायला गेल्याचे आढळले आहे.
त्यामुळे या घटनेनंतर लगेच सोशल मिडियावर धोनीची वाहवा करणारे ट्विट, पोस्ट झळाकल्या आहेत. यात डिसिजन रिव्हू सिस्टिमला(डीआरएस) धोनी रिव्हू सिस्टिम म्हणून उल्लेख करत धोनीचे कौतुक करण्यात आले आहे.
Dhoni Review System #IndvPak
— Jatin Sapru (@jatinsapru) September 23, 2018
Somebody needs to pick up MS Dhoni and bring him to me. Now. #PAKvIND
— Wajahat S. Khan (@WajSKhan) September 23, 2018
What a review, incredible MS Dhoni. #IndvPak
— Mohammad Kaif (@MohammadKaif) September 23, 2018
Dhoni is such a class!!!!!
Sharp minded.
MS is unbelievable.#INDVPAK— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) September 23, 2018
Dhoni had asked for a Review. There's nothing much that umpires could do about it. #Legend
— Aladdin (@Alllahdin) September 23, 2018
https://twitter.com/DHONIism/status/1043838189939482625
*Indian bowler appeals*
Umpire denies, but also secretly prays Dhoni doesn't ask for DRS 😁😁
— LOLendra Singh (@LOLendraSingh) September 23, 2018
https://twitter.com/DHONIism/status/1043837395097939968
महत्वाच्या बातम्या –
-कर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी
–एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा दारुण पराभव
–…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले