भारतात दररोज अनेक पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु असते, ज्यासाठी लाखो लोक अर्ज देत असतात. काहींना नोकरी मिळते तर काहींना रिकामे हात माघारी परतावे लागते. परंतु तुम्हाला माहीत आहे का, आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला माजी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी याने छत्तीसगडच्या एका शाळेत शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज दिला आहे. होय, हे खरं आहे. शिक्षकाच्या नोकरीसाठी एमएस धोनीने अर्ज दिला आहे. काय आहे संपूर्ण प्रकार चला जाणून घेऊया.
छत्तीसगडच्या एका इंग्लिश माध्यमातील शाळेत शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही पदे भरून काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. तसेच इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांची मुलाखत शुक्रवारी (०२ जुलै) घेतली जाणार होती. यामध्ये धक्कादायक बाब अशी की, या यादीत एमएस धोनीच्या नावाने अर्ज देण्यात आला होता. इतकेच नव्हे तर या नावाला मुलाखतीसाठी पात्रही ठरवले गेले होते. (Ms dhoni shortlisted for teacher requirement, list went viral on social media)
नावांची यादी होत आहे व्हायरल
शालेय प्रशासनाने अर्ज भरणाऱ्यांच्या नावांची निवड करून आपल्या अधिकृत सांकेतिक स्थळावर ही यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये एमएस धोनीचे ही नाव होते. ही यादी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांनतर धोनीच्या त्या नंबरवर कॉल देखील केला होता परंतु तो कॉल आता बंद येत आहे.
इतकेच नव्हे तर एमस धोनीच्या नावापुढे वडिलांचे नाव म्हणून चक्क माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले आहे. अशातच सिलेक्शन कमिटीच्या नोडल अधिकारी आणि डेप्युटी कलेक्टर सीमा पात्रे यांच्यासोबत संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, जो कोणी अज्ञात व्यक्ती आहे त्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
यापूर्वी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिचे नाव बिहारच्या एका कॉलेजच्या मार्कशीटमध्ये आले होते. ज्यामध्ये तिने टॉप केले होते. या मार्कशिटचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! गोलंदाज झुलन गोस्वामीची विश्वविक्रमी कामगिरी, आजवर कोणालाही नाही जमली
भर सामन्यात बेशुद्ध पडल्या होत्या विंडिजच्या २ महिला क्रिकेटर, रुग्णालयातून आली मोठी अपडेट
स्म्रिती मंधानाने बाउंड्रीजवळ टिपला अप्रतिम झेल, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘सुपरवुमन’