आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे, असे मत गौतम गंभीरने मांडले आहे. आपल्या वैयक्तिक कारणांमुळे रैनाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे गंभीरला असे वाटते की, धोनीने या संधीचा फायदा उचलला पाहिजे.
धोनीने केली पाहिजे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी
स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात धोनीबद्दल बोलताना गंभीरने म्हटले की, “रैनाच्या गैरहजरीत धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची ही चांगली संधी आहे. त्याला अधिकाधिक चेंडूंचा सामना करावा लागू शकतो. सोबतच तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, जी मागील काही वर्षांपासून तो भारतीय संघासाठी करत होता.”
का केली पाहिजे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी, गंभीरने सांगितले कारण
गंभीरचा असा विश्वास आहे की, धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. कारण संघात असे फलंदाज आहेत, जे फिनिशरची भूमिका निभावू शकतात.
याबाबत बोलताना गंभीर म्हणाला, “जर धोनी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला, तर त्याच्यानंतर त्यांच्याकडे केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, सॅम करन हे खेळाडू आहेत, जे आपली भूमिका निभावू शकतात. त्यामुळे मला वाटते की धोनीसारख्या खेळाडूला ही शानदार संधी आहे. आणि मला खात्री आहे की तो याचा फायदा उचलेल. आता रैनाही नाही, अशामध्ये तुम्हाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अनुभवी खेळाडूची आवश्यकता आहे. त्यामुळे धोनी ही भूमिका निभावू शकतो.”
१९ सप्टेंबरपासून होणार आयपीएलची सुरुवात
कोरोना व्हायरसमुळे २९ मार्चपासून होणाऱ्या आयपीएल २०२०ला पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर आता आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून होणार आहे. यातील अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सच्या हा शिलेदार अडकला होता चक्क चीयरलीडरच्या प्रेमात, आज तीच आहे…
-वयाची चाळीशी जवळ आली तरी ‘या’ क्रिकेटरची नाही तोड, नोंदवलाय टी२० कारकिर्दीतील मोठा पराक्रम
-रैनाच्या ट्वीटची घेतली पंजाब सरकारने दखल; उचलले मोठे पाऊल
ट्रेंडिंग लेख-
-काय तर, बेल्स हरवल्यामुळे सामना सुरु झाला नाही!
-आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल