इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला रविवारी (१७ जुलै) मॅनचेस्टरमध्ये तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळायचा आहे. वनडे मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला होता. भारतीय संघाचे माजी दिग्गज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, सुरेश रैना यांच्यासह एमएस धोनी देखील हा सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सवर उपस्थित होता. धोनी मागच्या काही दिवसांपासून इंग्लंमध्येच आहे. अशात त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चाहत्यांनी त्याच्याभोवती घेरा गातल्याचे दिसत आहे.
भारतीय संघाचे २००७ ते २०१६ दरम्यान कर्णधार राहिलेला एमएस धोनी (MS Dhoni) आणि त्यांचे कुटुंब मागच्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. धोनीने त्याचा ४१ वा वाढदिवसही (७ जुलै) लंडमध्ये साजरा केला. यष्टीरक्षक रिषभ पंत या वाढदिवसासाठी उपस्थित राहिला होता. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी टी-२० मालिकेदरम्यानही धोनी भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी पोहोचला होता.
भारतात असताना धोनीच्या भोवती नेहमीच चाहत्याची गर्दी असते. लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असताना धोनी चाहत्यांपासून लांब असल्यामुळे काही काळ एकटा फिरताना दिसला. पण चाहत्यांनी त्याठिकाणी देखील त्याचा पिच्छा सोडला नाही. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी लंडनच्या रस्त्यांवरही धोनीला गाठले आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काहीजण धोनीचे एक झलक पाहण्यासाठी त्याच्या मागे-मागे धावत होते. पण सुरक्षकांनी धोनी आणि चाहत्यांमधील अंतर कायम राखले आणि त्याला गाडीपर्यंत घेऊन गेले. लंडमधील धोनीची लोकप्रियता पाहून भारतीय चाहतेही खुश झाले आहेत. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
. @MSDhoni in the streets of london 🔥🔥pic.twitter.com/aLEurgsClH
— Dhoni Army TN™ (@DhoniArmyTN) July 16, 2022
दरम्यान, धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी भारतीय संघाला जिंकवून दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १९५ स्टंपिंग त्यांच्या नावावर आहेत. त्याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण आयपीएलमध्ये तो अजूनही खेळत आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने ४ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आयपीएल २०२२ च्या शेवटच्या सामन्यात धोनीने असेही स्पष्ट केले होते की, तो पुढच्या आयपीएल हंगामातही खेळणार आहे. चाहते त्याला पुन्हा एकदा खेळताना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘काय होईल जर मी पडलो? पण…’ आऊट ऑफ फॉर्म विराटचा इंस्टाग्राम पोस्टद्वारे टिकाकारांवर निशाणा
टी२० विश्वचषकात बुमराहला खेळवायचे असले तर ‘हे’ कराच, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा भारताला मोलाचा सल्ला