---Advertisement---

शिष्याच्या हातून पराभूत झाल्यानंतर गुरू धोनीचे अनोखे कारण; म्हणाला, ‘उंच काठीच्या गोलंदाजांमुळे आम्ही…’

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 1:29 PM
---Advertisement---

सोमवारी (४ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघावर ३ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी याने पराभवाचे खरे कारण काय? याबाबत भाष्य केले आहे.

पराभवानंतर एमएस धोनी म्हणाला, “आम्हाला १५० धावांचा जवळपास पोहचायचे होते. सुरुवातीला ४ गडी बाद झाल्यानंतर आम्ही १५-१६ षटकापर्यंत चांगल्या स्थितीत होतो. परंतु आम्हाला या डावाला गती देता आली नाही.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “माझ्या मते ही खेळपट्टी खेळण्यासाठी खूप कठीण होती. या खेळपट्टीवर १५० धावा देखील एक चांगली धावसंख्या होती. कारण या खेळपट्टीमध्ये गती होती. संपूर्ण सामना सुरू असताना ही खेळपट्टी मंदावली नाही. फलंदाजांना शॉट खेळताना अडचणीचा सामना करावा लागत होता. दिल्लीच्या फलंदाजांनाही याचा सामना करावा लागला. या खेळपट्टीवर उंच काठीच्या गोलंदाजांना भरपूर मदत मिळाली. त्यांच्या गोलंदाजीमध्ये हालचाल होत होती. आमच्यासाठी सुरुवातीच्या ६ षटकात कमी धावा देणे आवश्यक होते. परंतु एक षटक आम्हाला महागात पडले. जेव्हा तुमच्यासमोर चांगले फलंदाज फलंदाजी करत असतात. त्यावेळी अनेकदा असं होत असतं.”

दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात विजय मिळवून पुन्हा एकदा आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर तिसऱ्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आहे. या तिन्ही संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर चौथ्या स्थानासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चेन्नईविरुद्ध आयपीएल अध्यायाची सुरुवात करणारा रिपल पटेल आहे तरी कोण? ‘अशी’ राहिलीय कारकिर्द

“खूप शांती आहे आज”, तब्बल ५ महिन्यांनी विराट कोहलीचे पंजाब किंग्जला जोरदार प्रत्युत्तर

आयपीएलच्या १४ हंगामांच्या इतिहासात धोनी पहिल्यांदाच इतका वाईट खेळला, लाजिरवाणा विक्रम नावावर झाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---