बुधवारी (दि. 10 मे) आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीला 27 धावांनी पराभूत केले. या विजयामुळे चेन्नई प्ले ऑफ्सच्या जवळ पोहचला आहे. विजयानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने केलेल्या वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे.
चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामना चेन्नईने एकतर्फी विजय संपादन केला. त्यानंतर चेन्नईचा कर्णधार धोनी याने पारितोषिक वितरण समारंभात बोलताना स्वतःच्या कामगिरीविषयी म्हटले,
“हे माझे काम आहे, मी सर्वांना सांगितले आहे की, मला हेच करायचे आहे, मला खूप धावायला लावू नका. हे मला करण्याची गरज आहे. संघाच्या विजयात योगदान देवून आनंद झाला.”
धोनी आपला अखेरचा हंगाम खेळत असल्याची चर्चा आहे. या हंगामात तो फार फलंदाजी करत नाही. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात देखील त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 8 चेंडू खेळले. यामध्ये एक चौकार व दोन षटकारांच्या मदतीने त्याने 20 धावा केल्या.
या सामन्याचा विचार केल्यास, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना सर्व फलंदाजांच्या थोड्या थोड्या योगदानाच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 168 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवातच खराब झाली. त्यांनी आपले पहिले तीन गडी स्वस्तात गमावले. रायली रुसो व अक्षर पटेल यांनी थोडाफार संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना विजयीरेषा पार करण्यात त्यांना अपयश आले. या पराभवामुळे आता दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
(MS Dhoni Statement After Match Against Delhi Capitals In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video : वडील धोनीने षटकार मारताच झिवाने वाजवली शिट्टी, तर पत्नी साक्षीनेही केला आनंद साजरा
नाद करायचा नाय! चाहर 2018पासून गाजवतोय आयपीएलचा पॉवरप्ले, बोल्ट अन् शमीलाही पछाडत रचला विक्रम