---Advertisement---

धोनीने हैदराबादविरुद्ध ३ झेल घेत मोठ्या विक्रमाला घातली गवसणी, बाकी कोणी जवळपासही नाही

---Advertisement---

शारजाह। गुरुवारी (३० सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा ४४ वा सामना पार पडला. शारजाह क्रिकेट स्टेडियवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने एक खास विक्रम केला आहे.

धोनीने या सामन्यात यष्टीरक्षण करताना तीन झेल घेतले. त्याने चौथ्या षटकात जोस हेजलवूडच्या गोलंदाजीवर जेसन रॉयचा पहिला झेल घेतला. त्यानंतर अकराव्या षटकात ड्वेन ब्रावेच्या गोलंदाजीवर प्रियम गर्गचा झेल घेतला. तर तिसरा झेल त्याने रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर १३ व्या षटकात वृद्धिमान साहाचा घेतला.

धोनीची एका आयपीएल डावात ३ किंवा अधिक झेल घेण्याची ही १० वी वेळ ठरली. त्यामुळे १० वेळा असा कारनामा करणारा तो पहिला क्रिकेटर ठरला. आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा एका डावात ३ किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत धोनीच्या पाठोपाठ एबी डिव्हिलियर्स आहे. त्याने ५ वेळा असा कारनामा केला आहे.

सर्वाधिकवेळा एका आयपीएल डावात ३+ झेल घेणारे क्रिकेटर
१० वेळा – एमएस धोनी
५ वेळा – एबी डिविलियर्स
४ वेळा – रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, क्विंटन डी कॉक, पार्थिव पटेल, मनिष पांडे, रॉबिन उथप्पा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा,

धोनीचे चेन्नईसाठी १०० झेल
धोनीने गुरुवारी चेन्नई संघासाठी यष्टीमागे १०० झेल पूर्ण केले आहेत. एका संघासाठी १०० झेल पूर्ण करणारा तो पहिलाच क्रिकेटर ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा कोणालाही करता आलेला नाही. धोनीने आत्तापर्यंत यष्टीरक्षक म्हणून आयपीएलमध्ये १५८ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये ११९ झेल आणि ३९ यष्टीचीत विकेट्सचा समावेश आहे.

चेन्नईचा विजय
हैदराबादने या सामन्यात चेन्नईसमोर विजयासाठी १३५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १९.४ षटकात ४ विकेट्स गमावत १३९ धावा करत पूर्ण केला. या विजयासह चेन्नईने आयपीएल २०२१ च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नईचा हा ११ सामन्यांमधील ९ वा विजय ठरला.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर, फाफ डू प्लेसिसने ४१ धावा केल्या. त्याचबरोबर मोईन अलीने १७ धावांची खेळी केली. तर अखेर अंबाती रायडू आणि एमएस धोनी यांनी आक्रमक छोटेखानी नाबाद खेळी केल्या. रायडूने १७ आणि धोनीने १४ धावा केल्या.  हैदराबादकडून या सामन्यात जेसन होल्डरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, राशिद खानने १ विकेट घेतली.

या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १३४ धावा केल्या होत्या. हैदराबादकडून वृद्धिमान साहाने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. याशिवाय एकालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. चेन्नईकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, ड्वेन ब्रावोने २ विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

जस्ट ब्युटीफुल!! ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या चेंडूवर स्म्रीतीचा कडक ‘पुल शॉट’, व्हिडिओ होतोय व्हायरल

अन् चिमुकल्या अगस्त्यने काका कृणालचा मोठ्या पोस्टरवरील फोटो अचूक ओळखला, पाहा व्हिडिओ

हैदराबादच्या ३ फलंदाजांचे झेल पकडत धोनीचा सीएसकेसाठी ‘मोठा’ किर्तीमान, पार केला मैलाचा दगड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---