---Advertisement---

धोनीचा आणखी एक कौतुकास्पद निर्णय! सगळे खेळाडू घरी सुरक्षित परतल्यावर मगच जाणार रांचीला

On: गुरूवार, मे 6, 2021 2:34 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आपल्या करिष्माई नेतृत्वासाठी ओळखला जातो. मैदानावर त्याने आपल्या नेतृत्वाने घेतलेल्या अचूक निर्णयांनी संघाला अनेकदा अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळेच तो आजही जागतिक क्रिकेटमधील एक सर्वात यशस्वी आणि सार्वकालीन महान कर्णधार समजला जातो.
मात्र धोनी केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेर देखील नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत असतो. याचा प्रत्यय नुकताच आला. आयपीएल रद्द झाल्यानंतर अनेक खेळाडूंना घरी परतण्यासाठी अडचणी येत आहेत. याच संदर्भात एक निर्णय घेत धोनीने सगळ्यांची मने जिंकली आहेत.

खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी घेतला निर्णय
एक कर्णधार म्हणून मैदानासह मैदानाबाहेर देखील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. खेळाडूंची काळजी मैदानातच नाही तर मैदानाबाहेर देखील घ्यावी लागते. हीच बाब लक्षात घेऊन धोनीने आयपीएल रद्द झाल्यावर चेन्नईच्या खेळाडूंसाठी एक निर्णय घेतला आहे. यानुसार जोवर चेन्नईचे सगळे खेळाडू जोपर्यंत घरी परतत नाहीत, तो पर्यंत धोनीने देखील घरी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नईच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. मंगळवारी बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर परदेशी खेळाडूंना घरी जाण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच भारतातील काही खेळाडूंना देखील प्रवासाच्या निर्बंधांमुळे घरी परतणे, जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत विविध मार्गाने त्यांना घरी पोहोचवण्याचे प्रयत्न चालू आहेत. चेन्नईने आपल्या खेळाडूंसाठी खाजगी विमानाची व्यवस्था केली असून त्याद्वारे खेळाडूंना आपापल्या घरी सुखरुप पोहोचवण्यात येईल. परदेशी तसेच भारतीय खेळाडू सुरक्षितपणे आपापला घरी गेल्यावरच धोनी रांचीला जाईल, अशी माहिती या चेन्नईच्या अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, गेल्या काही दिवसात आयपीएल मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. काही खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर दोन सामने देखील स्थगित करावे लागले होते. मात्र अखेर त्याची वाढती व्याप्ती पाहून बीसीसीआयने हंगामच अनिश्चित काळासाठी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल भारतात आयोजित करण्याचा बीसीसीआयचा निर्णय चुकला का? गांगुलीने दिले उत्तर

यंदा सीएसके चांगली कामगिरी करेल, अशी मला अपेक्षाच नव्हती न्यूझीलंडच्या माजी अष्टपैलूचे धक्कादायक वक्तव्य

अंबानींच्या संघाची तऱ्हाच निराळी! परदेशी खेळाडूंना घरी पोहचवण्यासाठी केली खाजगी विमानाची व्यवस्था

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---