भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला क्रिकेटजगतातील आजवरच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानले जाते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने यशाची अनेक शिखरे पार केली. आज त्याचे नाव क्रीडाविश्वात आदराने घेतले जाते. मात्र, याच धोनीवर लहानपणी त्याच्या वडिलांचा देखील विश्वास नव्हता. स्वतः धोनीने एका कार्यक्रमात बोलताना या गोष्टीचा खुलासा केला आहे.
यशाची सर्व शिखरे पादाक्रांत करणारा क्रिकेटपटू म्हणून धोनी कडे पाहिले जाते. भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक तसेच कर्णधार म्हणून देखील त्याची ओळख आहे. मात्र, त्याच्या वडिलांनीच तो यशस्वी होणार नाही अशी भीती व्यक्त केली होती.
धोनी नुकताच एका कार्यक्रमात संवाद साधत होता. त्यावेळी बोलताना तो म्हणाला,
“दहावीच्य बोर्ड परीक्षेवेळी माझ्या वडिलांना वाटत होते की मी पास होऊ शकणार नाही. मात्र, मी पास झालो. त्यावेळी मला 66 टक्के गुण मिळालेले. तर बारावीतही 56-57 टक्के गुण मिळाले.”
धोनी पुढे बोलताना म्हणाला,
“सुरुवातीला मी सामान्य विद्यार्थी होतो. सातवीमध्ये असताना मी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून शाळेत माझी हजेरी कमी भरत होती. परंतु, खेळाबरोबरच मी अभ्यासात देखील सुधारलो होतो.”
धोनीने भारतासाठी तब्बल 15 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यादरम्यान तो 9 वर्ष भारताचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तसेच, वनडे व टी20 विश्वचषक देखील आपल्या नावे केला सोबतच चेन्नई सुपर किंग्सला चार वेळा आयपीएल विजेते व दोन वेळा चॅम्पियन्स लीग बनवण्याचा मान देखील त्याने मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: मालिका निर्णायक सामन्यात नाण्याचा कौल भारताच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
‘ही’ गोष्ट विजय किंवा पराभवाने ठरत नाही, रविचंद्रन अश्विनचे पीसीबी अध्यक्षांना सडेतोड प्रत्युत्तर