भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम-राम केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरीदेखील त्याची लोकप्रियता काही कमी झाली नाहीये. नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत त्याने भारतीय संघाच्या मेंटोरची जबाबदारी पार पाडली होती. आता सध्या तो रांचीमध्ये आपल्या निवासस्थानी परतला आहे. अशातच त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एमएस धोनी जेव्हा मैदानात असायचा त्यावेळी तो आपल्या फलंदाजीमुळे आणि हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असायचा. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी देखील तो सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तो रंगीबेरंगी पोपटासोबत मस्ती करताना दिसून येत आहे.
त्याची पत्नी साक्षी सिंग धोनीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर धोनीचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ‘कॅप्टन कुल’ एमएस धोनी रंगीबेरंगी पोपट खांद्यावर घेऊन चहाचा आनंद घेताना दिसून येत आहे. तसेच साक्षी सिंग धोनीने या फोटोवर कॅप्शन देत ‘माही’ आणि त्याचा ‘हनी’ असे लिहिले आहे. पुढे तिने हार्टचा ईमोजी देखील टाकला आहे. हा फोटो चाहत्यांच्या पसंतीचा ठरत आहेत.
https://www.instagram.com/p/CWYB1EZKJmI/?utm_medium=copy_link
तसेच चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर देखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यावर कॅप्शन म्हणून त्यांनी ‘चुम्मा किली’ असे लिहिले आहे.
Chumma Kili! ????????#Thala #WhistlePodu ???? pic.twitter.com/oGZjbvhpKS
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 17, 2021
यापूर्वी देखील त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरचे असे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये एमएस धोनी आणि झिवा मस्ती करताना दिसून आले होते. यूएईवरून परतल्यानंतर एमएस धोनी त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसून येत आहे. तसेच त्याचे आणखी काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तो टेनिस खेळताना दिसून आला होता. तसेच जिममध्ये घाम गाळताना दिसून आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी२० सामन्यातील १० महत्त्वपूर्ण गोष्टी
टीम इंडियाची सुरु झाली २०२२ टी२० विश्वचषकाची तयारी? कर्णधार रोहित शर्माने दिले संकेत





