जुलै 2019मध्ये आयसीसी आंतरराष्ट्रीय विश्वचषक पार पडला. या विश्वचषकानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने (MS Dhoni) क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. या विश्वचषकानंतर तो वेस्ट इंडीज (West Indies), दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध मालिका खेळला नाही.
पण आता पुढील महिन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध टी20 मालिका होणार आहे. त्या मालिकेतून दिग्गज यष्टीरक्षक एमएस धोनी पुनरागमन करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
धोनीने मागील दोन महिन्यांपासून त्याच्या फीटनेसवर काम करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर त्याने नेट्समध्येही फलंदाजीचा सराव करायला सुरुवात केली आहे.
विश्वचषकातील उपांत्यफेरीच्या 128 दिवसांनंतर (After 128 Days) रांचीतील जेेएससीए स्टेडियममध्ये (JSCA Stadium, Ranchi) धोनी नेट्समध्ये फटकेबाजी करताना पाहायला मिळाला आहे. याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो लवकरच पुनरागमन करेल, अशी चर्चा सुरु झाली होती.
मात्र बीसीसीआयच्या एका अधिकारीने पीटीआयला सांगितले की ‘धोनी वेस्टइंडीज मालिकेसाठी उपलब्ध नसेल.’
पण अजून त्याच्या पुनरागमनाबद्दल कोणतीही माहिती त्याच्याकडून किंवा बीसीसीआयकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही.
कॅप्टन कोहलीची इच्छा; मयंक म्हणाला, करतो मी पूर्ण https://t.co/V8P4psFGzj#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #ViratKohli #MayankAgarwal
— Maha Sports (@Maha_Sports) November 15, 2019
शतकी खेळीबरोबर मयंक अगरवालने घातली 'या' विक्रमाला गवसणी!
वाचा 👉https://t.co/OxlVvupVWr👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #MayankAgarwal— Maha Sports (@Maha_Sports) November 15, 2019